राज्य मंत्रीमंडळात पालट करणे, ही काळाची आवश्यकता !

मायकल लोबो, बंदर कप्तानमंत्री

मायकल लोबो

पणजी, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर हे पर्यटनमंत्री पदाचा पदभार सांभाळण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पर्यटन क्षेत्रातील विविध घटक पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्यावर नाराज झालेे आहेत. राज्य मंत्रीमंडळात पालट करणे, ही काळाची आवश्यकता बनली आहे, असे मत बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी ‘प्रूडंट मिडिया’च्या एका कार्यक्रमात बोलतांना केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळात पालट करण्याविषयी मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो आहे आणि याविषयी पुढील निर्णय मुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते घेणार आहेत.’’