मडगाव परिसरातून १३ लाख ६२ सहस्रांचे अमली पदार्थ कह्यात

अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई : ३ दलालांना अटक

अमली पदार्थांनी ग्रस्त गोवा !

पणजी, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – अमली पदार्थविरोधी पथकाने मडगाव परिसरात ३ ठिकाणी छापा टाकून १३ लाख ६२ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले. या कारवाईत ३ अमली पदार्थ दलालांना अटक करण्यात आली. हे तिघेही २२ वर्षांचे आहेत. हा छापा मध्यरात्री घालण्यात आला आणि तिघांकडूनही मारिजुआना (गांजा) जप्त करण्यात आला. खारेबांध येथून मुहाफिज पठाण याच्याकडून १ किलो ३१ ग्रॅम, मूळ ओडिशा येथील आणि सध्या माजोर्डा येथे रहाणार्‍या मिलन पिलाई याच्याकडून १० किलो ३१ ग्रॅम आणि कोंबा येथून विनायक जुवारकर याच्याकडून २ किलो अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.