काँग्रेसने हकालपट्टी केलेले उर्फान मुल्ला यांचा भाजपात प्रवेश

उर्फान मुल्ला

पणजी, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – काँग्रेसने १७ नोव्हेंबर या दिवशी पुढील ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केलेले काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे माजी प्रमुख उर्फान मुल्ला यांनी त्यांच्या समर्थकांसह १८ नोव्हेंबर या दिवशी भाजपात रितसर प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात उर्फान मुल्ला यांना भाजपात प्रवेश दिला.

उर्फान मुल्ला यांनी पूर्वी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करत काँग्रेस पक्षातील विविध पदांचे त्यागपत्र दिले होते. पक्षविरोधी कृती केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने उर्फान मुल्ला यांचे ६ वर्षांसाठी प्राथमिक सदस्यत्व रहित केले होते. भाजपात प्रवेश केल्यानंतर उर्फान मुल्ला काँग्रेसवर गंभीर आरोप करतांना म्हणाले, ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उमेदवारी देण्याविषयी दलाली चालू आहे.’’