(म्हणे) ‘आप सत्तेवर आल्यास ७३ टक्के गोमंतकियांना विनामूल्य वीज मिळेल !’ – राघव चढ्ढा, आपचे देहलीतील आमदार

  • सत्तेवर येण्यासाठी आम आदमी पक्षाकडे आमिषे दाखवण्यापलीकडे गोव्यातील आणखी काही जनहितकारी सूत्रे नाहीत, असेच म्हणावे लागेल !
  • जनतेला फुकटे बनवणारे नव्हे, तर स्वावलंबी आणि उद्योगी बनवणारे राज्यकर्ते हवेत !
  • ‘गरिबाला मासा देऊ नका, तर मासे पकडण्याचा गळ द्या’, अशी इंग्रजीतील गरिबांना लाचार बनण्यापासून रोखणारी म्हण आपचे नेते विसरले वाटते.
राघव चढ्ढा

पणजी – आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) सत्तेवर आल्यास २०० युनिटपेक्षा अल्प वीज वापरणार्‍या ७३ टक्के गोमंतकियांची वीजदेयके ४८ घंट्यांत माफ केली जातील, असे आमीष देहलीतील आपचे आमदार राघव चढ्ढा यांनी गोंमतकियांना दिले आहे. जे वीजग्राहक २०० युनिटपासून ४०० युनिटपर्यंत वीज वापरतात, त्यांना ५० टक्के देयक आकारले जाईल.

 राघव चढ्ढा म्हणाले, ‘‘गोव्यातील वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी विजेच्या संदर्भातील देहलीतील आप सरकारचे धोरण विरुद्ध भाजपचे वीजधोरण या संदर्भात चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. त्यासाठी मी गोव्यात आलो आहे.’’

चर्चा देहलीच्या वीजमंत्र्यांसमवेत होऊ शकते ! – नीलेश काब्राल

राघव चढ्ढा यांच्या या आव्हानाला उत्तर देतांना वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी म्हटले आहे की, चर्चा करण्याचेच सूत्र असेल, तर ती चर्चा आपच्या देहलीतील कुठल्याही आमदाराशी नव्हे, तर देहलीच्या वीजमंत्र्यांशी होऊ शकते.