सर्व समविचारी संघटनांनी एकत्र येऊन कार्य करावे !

हिंदुजागृतीचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय पावले उचलू शकतो, याचाही निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत योग्य आहे. या अधिवेशनाने नि:संशय उत्तरोत्तर प्रगती करावी, यासाठी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात एकत्र आलेली शक्ती हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात कृतीशील होईल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘हिंदु राष्ट्राची संकल्पना ही आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृती आणि विश्वदर्शन यांचे नाव आहे. हिंदू ‘चराचरात ब्रह्म आहे’, असे मानत असल्यामुळे त्याचा उपभोग घेण्याची हिंदूंची संस्कृती नाही. त्यामुळे भारतात हिंदु राष्ट्र स्थापन झाले की, त्याद्वारे विश्वकल्याणाचे कार्य होईल, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक ! – डॉ. एस्.आर्. लीला, माजी आमदार, तथा लेखक, बेंगळुरू, कर्नाटक

साम्यवादी विचारसरणी राष्ट्रहिताला हानीकारक आहे. आपल्याशी सद्भावाने वागणार्‍या व्यक्तीशीच आपण सद्भावाने वागले पाहिजे. दुष्टवृत्तीने वागणार्‍यांपासून सज्जनांचे रक्षण केलेच पाहिजे, ही रामायणाची शिकवण आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होणार्‍या संघर्षासाठी भगवंतांच्या उपासनेतून सिद्ध झालेले आत्मबल वाढवा !

भविष्यात हिंदु राष्ट्र विरोधकांशी संघर्ष हा होणारच आहे. संघर्षाविना देशाला स्वातंत्र्यही मिळाले नाही, तर हिंदु राष्ट्र कसे मिळेल ? यासाठी आजपासून सर्व प्रकारची सिद्धता केली पाहिजे. संघर्षासाठी भगवंतांच्या उपासनेतून सिद्ध झालेले आत्मबल आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येकाने ईश्‍वरीय उपासना करायला हवी – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु संघटना स्‍थापन करण्‍याच्‍या उद्देशाचे महत्त्व !

आजपासून श्री रामनाथ देवस्‍थान, गोवा येथे चालू होत असलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या निमित्ताने…

हिंदूंचा आवाज बुलंद करणारे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन म्‍हणजेच ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ !

आज देशभरात हिंदु राष्‍ट्राची चळवळ जोर धरत आहे. ही जागृती होण्‍यामध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे संघटन करणार्‍या अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा मोलाचा वाटा आहे.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन करण्‍यामध्‍ये आलेले विविध अडथळे आणि ते दूर करण्‍यासाठी केलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन करणार्‍या साधकांनी एप्रिल २०२३ मध्‍ये या सेवेला आरंभ केला. तेव्‍हा त्‍यांना या सेवेत विविध अडथळे येत असल्‍याचे लक्षात आले. आध्‍यात्मिक उपायांमुळे अडथळ्‍यांवर मात करता आली. याचा वृत्तांत येथे देत आहोत.

जून २०२३ या मासात रामनाथ देवस्‍थान, गोवा  येथे होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ या नावाच्‍या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनातून मानसिक आणि बौद्धिक या स्‍तरांवरील कार्याच्‍या व्‍याप्‍तीसह आध्‍यात्मिक स्‍तरावरील कार्याच्‍या व्‍याप्‍तीतही वाढ होण्‍याची ही अनुभूती आहे’, असे मला जाणवले….

विदेशात ख्रिस्‍ती पंथाची होत असलेली दुर्दशा आणि त्‍याचा भारतात वाढत असलेला प्रभाव

पृथ्‍वीच्‍या दक्षिण भागात श्रद्धाळू आणि चर्चशी जोडलेले लोक यांच्‍या संख्‍येत विलक्षण वृद्धी झाली आहे. भारतासारख्‍या अन्‍य देशांना ख्रिस्‍त्‍यांचे ‘डम्‍प यार्ड’ (कचरा फेकण्‍याचे क्षेत्र) बनवले जात आहे. एक प्रसिद्ध ख्रिस्‍ती धर्मोपदेशक सांगत आहेत की, पृथ्‍वीच्‍या दक्षिण भागामध्‍ये चर्च जलद गतीने विकसित होत आहेत. त्‍यामुळे वर्ष २०६० पर्यंत पृथ्‍वीच्‍या दक्षिण क्षेत्रात ख्रिस्‍ती लोकांची संख्‍या ३४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढत जाईल.

‘द कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !