१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…
‘अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये ख्रिस्ती लोकसंख्या न्यून होत चालली आहे, म्हणजे ख्रिस्ती धर्माचा नाश होत चालला आहे. त्यामुळे आपल्या समस्या आपोआपच नष्ट होत चालल्या आहेत. ‘गॅलोप पोल’ ही अमेरिकेतील एक संशोधन करणारी संस्था आहे. तिच्या म्हणण्यानुसार ४७ टक्के अमेरिकी आता चर्चमध्ये जात नाहीत. याचा अर्थ अर्ध्यापेक्षा अधिक अमेरिकी आता ख्रिस्ती नाहीत आणि ते चर्चमध्ये जात नाहीत.
अमेरिकेमध्ये असाच ‘सदर्न बॅप्टीस्ट’ नावाचा एक फार मोठा संप्रदाय आहे. तो वर्ष २००६ पासून आतापर्यंत जवळजवळ २० लाख ख्रिस्ती लोकांना हरवूून बसला आहे. दुसर्या आणखी काही संशोधन करणार्या संस्था आहेत. त्यांच्यानुसार एवढी वर्षे जे ख्रिस्ती बनले आहेत, ते ‘डोन्ट्स’ या नावाने ओळखले जातात. या ‘डोन्ट्स’चा अर्थ आहे, ‘आम्हाला ज्ञान नाही’ (वुई डोन्ट नो) आणि ‘देव आहे, यावर आम्ही विश्वास ठेवत नाही’. तेथे ‘डोन्ट्स’चा एक वर्ग निर्माण झाला आहे. इंग्लंडमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. वर्ष २०१३ मध्ये त्यांची संख्या पुष्कळ उणावली होती. असेच चालत राहिले, तर वर्ष २०२० ते २०२५ मध्ये ख्रिस्ती लोकांची इंग्लंडमधील टक्केवारी १.४ ते २.१७ पर्यंत म्हणजे तेवढीच राहील, असा अंदाज आहे.
असे असतांना एवढे चर्च का उभारले जात आहेत ? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ५-१० किलोमीटर अंतरावर आपल्याला एक चर्च दिसून येईल. एक तर ही टक्केवारी चुकीची आहे किंवा हे लोक भूमी हडप करण्यात गुंतले आहेत. एका प्रमुख ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या मते संपूर्ण जगाच्या अहवालानुसार ख्रिस्ती लोकांची वाढ तीव्र गतीने होत आहे. पृथ्वीच्या दक्षिण भागात श्रद्धाळू आणि चर्चशी जोडलेले लोक यांच्या संख्येत विलक्षण वृद्धी झाली आहे. भारतासारख्या अन्य देशांना ख्रिस्त्यांचे ‘डम्प यार्ड’ (कचरा फेकण्याचे क्षेत्र) बनवले जात आहे. एक प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मोपदेशक सांगत आहेत की, पृथ्वीच्या दक्षिण भागामध्ये चर्च जलद गतीने विकसित होत आहेत. त्यामुळे वर्ष २०६० पर्यंत पृथ्वीच्या दक्षिण क्षेत्रात ख्रिस्ती लोकांची संख्या ३४ टक्क्यांपर्यंत वाढत जाईल.
१. भारताला ‘ग्लोबल साऊथ’ (दक्षिण क्षेत्र) संबोधण्यामागील कारण
भारताला पृथ्वीचे ‘ग्लोबल साऊथ’ (दक्षिण क्षेत्र) असे म्हटले जाते (?), हे बुद्धीभेद करण्याचे एक तंत्र आहे. ख्रिस्त्यांनी बुद्धीभेद करण्याच्या तंत्रामध्ये प्राबल्य मिळवले आहे. त्यात शब्दांचा प्रयोग हे एक प्रभावशाली तंत्र आहे. त्या माध्यमातून लोकांच्या मेंदूवर आक्रमणे केली जातात. कोणताही एक नवीन शब्द उत्पन्न करतात. त्याला प्रथम प्रसारमाध्यमे आणि आता ‘इंटरनेट’ यांच्या माध्यमातून समाजात पसरवतात. त्यानंतर तो हळूहळू लोकांच्या मेंदूत स्थापन करतात. ‘विकसनशील देश’ (थर्ड वर्ल्ड कंट्री) हे असेच एक नाव आहे. ‘अमेरिकी स्वप्न’ (अमेरिकन ड्रिम) हेही नाव सिद्ध करण्यात आलेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला ख्रिस्ती लोकांच्या दृष्टीने ‘पृथ्वीचे दक्षिण क्षेत्र’, या नावाने ओळखले जात आहे आणि हा त्यांचा सध्याचा निर्धारित कार्यक्रम (अजेेंडा) आहे. पाश्चात्त्य देशात ख्रिस्ती पंथीय न्यून होत आहेत. त्यामुळे ते ‘पृथ्वीच्या दक्षिण क्षेत्रा’तून नवीन ख्रिस्ती आयात करत आहेत. हा त्यांचा निर्धारित कार्यक्रम चालू आहे.
२. भारताची कथित धर्मनिरपेक्षता !
भारत हा तसाही धर्मनिरपेक्ष देश आहे आणि येथील हिंदूही पुष्कळ सहिष्णु आहेत. एवढ्या वर्षांमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या वाढत चालली आहे. समस्या ही आहे की, जेव्हा एक हिंदु ख्रिस्ती होतो, तेव्हा त्याच्यामध्ये राष्ट्रविरोधी भावना निर्माण होतात. या माध्यमातून ख्रिस्त्यांकडून राष्ट्रविरोधाला प्रोत्साहन दिले जात आहे. ते केवळ आपली गीता हिसकावून घेऊन त्याच्या हातामध्ये बायबल देत नाहीत, तर राष्ट्रविरोधी भावना निर्माण करतात. सर्वप्रथम त्या हिंदूला त्याच्या कुटुंबाविषयी द्वेष करायला शिकवले जाते आणि त्याला कुटुंबापासून तोडले जाते. हे सर्व बायबलच्या सिद्धांतांमध्ये अंतर्भूत आहे. नंतर त्याचे शेजारी, नातेवाईक, सण-उत्सव यांमध्ये वावरण्यावर निर्बंध लावले जातात. शेवटी प्रथा-परंपरांचे पालन करणार्या हिंदूला त्याचा धर्म आणि संस्कृती यांपासून दूर केले जाते. हा त्यांचा निर्धारित कार्यक्रम असतो. जेव्हापासून (१ सहस्र ७०० वर्षांपासून) ‘ख्रिस्तायत’ आली आहे, तेव्हापासून ते हेच करत आले आहेत. अशा प्रकारे ‘ख्रिस्तायत’ ही राष्ट्रविरोधाला प्रोत्साहन देते. ख्रिस्तायतचे प्रमुख असलेल्या पाद्रींनी अशी वाक्ये दिली आहेत, जी मला वाचायला लाज वाटते. ते ‘या भारतमातेचे किती पती आहेत ?’, असा प्रश्न करतात. त्यांनी हिंदूंच्या ३३ कोटी देवीदेवतांना भारतमातेचे पती बनवले आहे. धर्मांतर करणे, हा त्यांचा एक मोठा उद्योग आहे.
३. वैयक्तिक ते आध्यात्मिक स्तरापर्यंतच्या उपाययोजना
यावर वैयक्तिक, सामाजिक, घटनात्मक आणि आध्यात्मिक या ४ स्तरांवर उपाययोजना करायला पाहिजे.
३ अ. वैयक्तिक स्तरावरील उपाय : सर्वप्रथम आपण स्वतःला ज्ञानवंत करून घ्यावे. आपण आपल्या धर्माविषयी ज्ञान मिळवतो; पण आपल्याला आपल्या शत्रूविषयी आणि त्याच्या रणनीतीविषयी काहीही ठाऊक नसते. त्यांच्या सिद्धांताविषयी माहिती करून घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्यांचा प्रतिवाद करता येईल. पाश्चात्त्य देशांमध्ये ख्रिस्तीत्व घटत चालले आहे. त्या कारणांचाही आपल्याला लाभ घेता आला पाहिजे. सध्या ‘इंटरनेट’वर सर्वकाही मिळते. तेथे जाऊन वाचा. ‘ख्रिस्तायत’ला नष्ट करण्यासाठी आणखी अधिक काही करण्याची आवश्यकता नाही; केवळ एक हलकासा धक्का देण्याची आवश्यकता आहे. पाश्चात्त्यांनी आधीपासूनच ‘ख्रिस्तायत’ला नष्ट करण्याचा आरंभ केला आहे. त्या आधारे ख्रिस्ती पंथियांचा प्रभाव असणार्यांशी आपण संवाद करू शकतो. त्यांना ‘ख्रिस्तायत’चे संकट समजावून देऊ शकतो. अशा प्रकारे पाश्चिमात्य धर्मप्रचारकांचा विरोध करू शकतो. यासमवेतच आपली शास्त्रे, इतिहास, आपला वारसा यांचा अभ्यास करू शकतो.
आपण हिंंदु कुटुंबामध्ये जन्माला आलो. हिंदु घरात जन्माला येणे आणि हिंदुत्व बाणवणे यांमध्ये पुष्कळ अंतर असते. मी एक उदाहरण सांगते. एका १२ वर्षांच्या हिंदु मुलाला तुम्ही विचारा, ‘संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवतात ?’ त्याच्याकडे याचे उत्तर नसते. ‘सर्वजण उडवतात; म्हणून मी उडवतो.’ एवढेच त्याचे उत्तर असते. उलट एका ६ वर्षांच्या ख्रिस्ती मुलाला विचारा, ‘ईस्टरच्या दिवशी काय असते ?’ तर तो ३ पानांचे उत्तर देईल. आपल्या मुलांची ही दशा आहे. यात हिंदु पालकांचीच चूक आहे. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच हिंदुत्वाविषयी माहिती दिली पाहिजे. ख्रिस्ती लोक त्यांच्या मुलांना प्रत्येक रविवारी, म्हणजे वर्षाचे ५२ रविवार चर्चमध्ये घेऊन जातात. आपल्या मुलांना हिंदुत्वाला मोकळेपणाने ओळखायला शिकवा. जगाच्या पाठीवर कुठेही असो आपल्यात साहसाने हिंदुत्व बाणवण्यास शिकवा. ते जेव्हा तुम्हाला ख्रिसमस, ईद किंवा नववर्ष यांच्या वेळी शुभेच्छा पाठवतील, तेव्हा तुम्ही त्यांना ‘गीता’ किंवा ‘रामायण’ यांमधील श्लोक पाठवा. हिंदूंच्या समस्यांविषयी मोकळेपणे रडता आले पाहिजे आणि उघडपणे लढताही आले पाहिजे.
३ आ. सामाजिक स्तरावरील उपाययोजना : आपल्याला जे काही माहिती आहे, ते आपल्या ओळखीच्या लोकांना सांगितले पाहिजे. एक ख्रिस्ती हिंदूला भेटतो, तेव्हा त्याला हिंदूच्या वैयक्तिक समस्यांची माहिती असते. त्यामुळे तो वेळ न दवडता त्वरित त्यांच्या चर्चमध्ये येण्याचे निमंत्रण देतो. तो ‘येशूला मानले, तर तुमच्या सर्व समस्या समाप्त होतील’, असे सांगतो. याउलट कुणी ख्रिस्ती सहकारी हिंदूकडे समस्या घेऊन गेला, तर हिंदु चुकूनही त्याला काही उपाय सुचवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे आपण सतत आपल्या धर्माविषयी बोलत राहिले पाहिजे. आपण आपल्या वैयक्तिक जीवनात अनुभवलेल्या अनुभूती ख्रिस्ती व्यक्तीला मोकळेपणाने सांगा. आजचे हे कुरुक्षेत्र (युद्ध) अधिकांश सामाजिक माध्यमांमधून लढले जात आहेत. त्यामुळे सामाजिक माध्यमांच्या क्षेत्रात सहभाग घ्या. चुकीच्या गोष्टींना विरोध करा किंवा तुमच्या आधीपासूनच जे विरोध करत आहेत, त्यांना निदान समर्थन द्या. २ वर्षांपूर्वी मी काही वादग्रस्त सूत्र उपस्थित केले होते. तेव्हा विरोधकांच्या प्रतिवादावर मला स्वत:च प्रत्युत्तर द्यावे लागले होते; पण आता तसे नाही. आता माझ्या वादग्रस्त सूत्रावर कितीतरी हिंदु बांधव लढत असतात. हिंदू जागृत झाले आहेत, असे मला वाटते.
अधिकाधिक लोकांनी चित्रपटनिर्मिती क्षेत्रामध्ये गेले पाहिजे. तेथे पुष्कळ प्रमाणात हिंदुविरोधी दुष्प्रचार चालू आहे. ‘अॅमेझॉन प्राईम’, ‘नेटफ्लिक्स’ यांवरील मालिका किंवा कोणतेही चलचित्र पहा, ते सराईतपणे हिंदुविरोधी विषय मिसळत असतात. तेथे मुसलमान आणि ख्रिस्ती पात्रांना चांगले, तर हिंदु पात्रांना नकारात्मक दाखवले जाते. असे नसेल, तर ते संहिता स्वीकारत नाहीत. त्यामुळे भारतनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ चित्रपट बनवले गेले पाहिजेत. तुम्ही एखाद्या हिंदु गरजवंताला पैशांचे साहाय्य करू शकत नसाल, तर किमान त्याच्या जवळ उभे तरी रहा.
३ इ. राज्यघटनेच्या स्तरावरील उपाययोजना : ‘सेक्युलर’ (निधर्मी) हा शब्द आमच्या राज्यघटनेत आणीबाणीच्या काळात घालण्यात आलेला आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. के.टी. शहा राज्यघटनेचे सदस्य होते. जेव्हा राज्यघटना लिहिली जात होती, तेव्हा त्यांनी २ वेळा याचा प्रस्ताव मांडला. त्या दोन्हीही वेळा त्यांचा प्रस्ताव स्वीकारला गेला नाही. एकदा नेहरूंनी आणि नंतर डॉ. आंबेडकर यांनी तो नाकारला होता. नंतर वर्ष १९७६ मध्ये तो घुसडण्यात आला.
मी विचारते की, जर एक सुधारणा करून तो शब्द राज्यघटनेत जोडण्यात आला, तर एखाद्या सुधारणेला काढलेही जाऊ शकते. आपण निधर्मी शब्द काढण्याची मागणी करायला पाहिजे. तो शब्द आमच्यावर बळजोरीने थोपवला जाता कामा नये.
३ ई. आध्यात्मिक स्तरावर उपाययोजना : पुष्कळ लोकांनी ‘राज्यघटनेत जे परिवर्तन करायला पाहिजे’, असे सर्वांनी सांगितले आहे; परंतु आध्यात्मिक स्तरावरही प्रयत्न करायला हवा; कारण की आम्ही सनातनी लोक आहोत आणि आम्ही ‘आध्यात्मिकता काय असते अन् याचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात किती महत्त्व आहे ?’, हे जाणले आहे. जेव्हा आपण एका ठिकाणी बसून ध्यान लावतो, तर त्या वेळी ईश्वर आपल्याला साहाय्य करतो. त्याच्या साहाय्यामुळे आपल्याला यश मिळते, ते आपल्याला ठाऊकच आहे आणि जेव्हा आम्ही ईश्वरी अधिष्ठाने ठेवून सामूहिक संकल्प करतो, तेव्हा ईश्वरालाही आम्हाला हिंदु राष्ट्र द्यावेच लागेल. भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे,
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥
– श्रीमद़्भगवद़्गीता, अध्याय २, श्लोक ३
अर्थ : हे पार्था (अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा रहा.
आम्हाला तर उठावेच लागेल आणि आपण उठून लढणारही आहोत अन् आम्ही भारताला विश्वगुरु बनवू, जे भारताचे खरे स्थान आहे.’
– श्रीमती एस्थर धनराज, सहयोग निर्देशक, भगवद़्गीता फाऊंडेशन फॉर वेदिक स्टडीज, भाग्यनगर, तेलंगाणा