Anti-Hindu Congress : काँग्रेस सरकारच्या काळात ‘डीडी न्यूज’च्या पत्रकारांना स्वतःच्या मनगटावर लाल दोरा बांधण्याचीही अनुमती नव्हती !

काँग्रेसचा हिंदुद्वेष !

डीडी न्यूज’चे वरिष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव

नवी देहली – काँग्रेस सरकारच्या काळात ‘डीडी न्यूज’ या सरकारी वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना स्वतःच्या मनगटावर लाल दोरा बांधण्याची अनुमती नव्हती. ‘तुम्ही बांधलेला लाल दोरा पडद्यावर दिसता कामा नये’, अशा शब्दांत दूरदर्शनचे अधिकारी पत्रकारांना धमकावत असत.

‘डीडी न्यूज’चे वरिष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी लाल दोरा परिधान करण्यामागचे कारण आता सामाजिक माध्यमांद्वारे उघड केले आहे. अशोक श्रीवास्तव म्हणाले, ‘’जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा एके दिवशी उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी मला दूरध्वनी केला आणि माझ्या मनगटावरील लाल दोर्‍याविषयी प्रश्‍न विचारेला. त्या वेळी मी त्यांना ‘मी माझी ओळख म्हणून लाल दोरा बांधतो’, असे सांगितले. ‘तुम्ही बांधलेला लाल दोरा पडद्यावर दिसू नये’, अशी समज त्यांनी मला दिली. ही घटना वर्ष २००६ मध्ये घडली होती.’’

श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाल्याचा उल्लेख असलेले भजन गाण्यापासून गायिकेले रोखले होते !

अशोक श्रीवास्तव यांच्या या खुलाशाच्या आधीच दूरदर्शनवर काँग्रेसच्या काळात हिंदु चिन्हे न दाखवल्याचा आरोप होत होता. लोकगायिका मालिनी अवस्थी यांनीही एका कार्यक्रमात याविषयी खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, वर्ष २००५ मध्ये दूरदर्शनवर एक धार्मिक भजन गाण्यापासून त्यांना रोखण्यात आले होते; कारण त्यात भगवान श्रीरामाचा जन्म अयोध्येत झाल्याचा उल्लेख होता. दूरदर्शन आपल्या राजकीय धोरणांसाठी चालवल्याचा आरोपही काँग्रेसवर आहे.

वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीतही केली होती काटछाट !

याखेरीज काँग्रेसच्या राजवटीत वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीतही काटछाट करण्यात आली होती.

काँग्रेसकडून दूरदर्शनमधील अनेक पत्रकारांची हकालपट्टी !

वर्ष २००४ मध्ये काँग्रेस सत्तेत येताच तिने मोठ्या संख्येने पत्रकारांची हकालपट्टी केली होती. दूरदर्शनमधून हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये पत्रकार दीपक चौरसिया यांचाही समावेश होता.

संपादकीय भूमिका

एरव्ही पुरोगाम्यांकडून हिंदूंना ‘कुणी काय परिधान करावे आणि करू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे’, असा उपदेशाचा डोस पाजला जातो. असा डोस पुरोगाम्यांनी त्या वेळी काँग्रेसला का पाजला नाही ?, हे हिंदूंना कळले पाहिजे !