नवी देहली : आतंकवाद्याचा आदर्श असणारा झाकीर नाईक याची हिंदुद्वेषी वाहिनी ‘पीस टीव्ही’ बांगलादेशामध्ये पुन्हा एकदा प्रसारित होऊ शकते. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारकडून संमती मिळताच या पुन्हा प्रसारण चालू होईल, अशी माहिती स्वतः झाकीर नाईक याने दिली. वर्ष जुलै २०१६ मध्ये ढाका येथील होली आर्टिसन बेकरीवरील आतंकवादी आक्रमणानंतर ‘पीस टीव्ही बांग्ला’चे प्रसारण बंद करण्यात आले होते; कारण पकडलेल्या आरोपींपैकी एकाने सांगितले होते की, तो झाकीर नाईक याच्या शिकवणीमुळे प्रेरित झाला. या घटनेनंतर भारतातही अन्वेषण चालू झाले, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये ‘पीस टीव्ही’चे प्रक्षेपण बंद करण्यात आले.
झाकीर नाईक याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की, उपग्रहाच्या माध्यमातून पीस टीव्ही बंगाली, उर्दू, इंग्रजी आणि चिनी भाषांमध्ये प्रसारित होत आहे; मात्र बांगलादेशामध्ये सरकारची अनुमती नसल्यामुळे प्रसारण बंद आहे. सरकारकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. अनुमती मिळाल्यास बंगाली पीस टीव्ही काही दिवसांत किंवा आठवड्यांत प्रसारण चालू करेल.