मुख्‍यमंत्र्यांच्‍या दसरा मेळाव्‍याविषयी याचिकाकर्त्‍याला प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याचे न्‍यायालयाचे आदेश !

या कार्यक्रमासाठी एकूण १० कोटी रुपये खर्च झाला, असा आरोप याचिकाकर्त्‍याने केल्‍याने न्‍यायालयाने याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

दोन निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची निर्दोेष मुक्तता झाल्याप्रकरणी आरोपींचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा अधिवक्त्यांच्या हस्ते सत्कार !  

गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या बाजुने खटला लढवून त्यांचे निर्दोषत्व उत्कृष्टपणे सिद्ध केल्याविषयी इचलकरंजी येथील अधिवक्त्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

भारतामध्‍ये मृतदेहाची विटंबना वैध ?

‘भारतीय दंड विधानामध्‍ये मृतदेहावर बलात्‍कार करणे, हा गुन्‍हा होत नाही’, हे योग्‍य आहे का ? प्रत्‍येक गोष्‍टीत न्‍यायालयाला लक्ष घालावे लागते आणि जर त्‍यांच्‍या सूचनांचे पालन प्रशासन करत नसेल, तर हा पांढरा हत्ती का पोसायचा ?’

पोलिसांनी शिकवल्‍यानुसार पंच नितीन जाधव साक्ष देत आहेत ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

संशयित आरोपीच्‍या अधिवक्‍त्‍यांनी समीर गायकवाड यांच्‍या अटकेचा पंचनामा करणारे पंच नितीन जाधव यांची उलट तपासणी घेतली. त्‍या वेळी पंच नितीन जाधव यांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर न देता वेळकाढूपणा करत होते, तसेच एकाच प्रश्‍नाची वेगवेगळी उत्तरे देत होते.

हिंदु मुलाशी लग्न करणार्‍या मुसलमान तरुणीला केरळ पोलिसांनी मंदिरातून ओढत नेले !

एखाद्या हिंदु मुलीचा मुसलमान तरुणाशी विवाह चालू असतांना तो रोखण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले असते का ?

रथयात्रेवर बंगाल पोलिसांनी निर्बंध घालणे, हा धार्मिक प्रथेत हस्तक्षेप ! – कोलकाता उच्च न्यायालय

यावरून बंगाल सरकार घटनेला अनुसरून निर्णय घेत नसल्याचे स्पष्ट होते. असे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य ठरेल !

मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही गांभीर्याने प्रयत्न करत आहोत !

जनहित याचिकेवरून गुजरात सरकारचे उच्च न्यायालयात प्रतिपादन !

दुचाकीची चावी काढून घेण्‍याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही ! – मुंबई सत्र न्‍यायालय

परवाना जमा केल्‍यानंतर नियम भंग करणार्‍या चालकाला वाहतूक पोलीस ठाण्‍यात येण्‍याची सक्‍ती करता येणार नाही, असे मत न्‍यायालयाने नोंदवले.

छत्तीसगडमध्‍ये गेल्‍या ४ वर्षांत हिंदूंच्‍या धर्मांतरामध्‍ये वाढ ! – सौ. ज्‍योती शर्मा, प्रांत सहसंयोजक, हिंदु जागरण मंच, छत्तीसगड

कोणत्‍याही राज्‍यात होत नसेल, एवढे हिंदूंचे धर्मांतर छत्तीसगड राज्‍यात चालू आहे. यात मागील ४ वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. ख्रिस्‍ती धर्मप्रचारक पैसे आणि रेशन यांचे प्रलोभन देऊन महिलांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत.

बंगालमध्ये पंचायत निवडणुकांसाठी केंद्रीय बलांची नियुक्ती योग्य ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पंचायत स्तरावरील निवडणुकांसाठी  केंद्रीय बलांची नियुक्ती करावी लागते, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटच लागू केली पाहिजे !