अभ्यास कमी करतो; म्हणून विद्यार्थ्याला मारणार्‍या शिक्षकांच्या विरोधात गुन्हा    

अभ्यास कमी करण्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला महाविद्यालयात अमानुष मारहाण करणारे शिक्षक उजागरे आणि जावळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षकांची २८७ रिक्त पदे भरली जाणार

जिल्ह्यात २८७ शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया चालू झाली आहे. याची अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध  होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी शिक्षण समिती सभेत दिली.

शासनाने दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे मागण्या मान्य न केल्यास २१ फेब्रुवारीपासून शिक्षकांचे ‘असहकार आंदोलन’ !

शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन देऊनही शासनाने ते पाळले नाही. त्यामुळे २० फेब्रुवारीपर्यंत शासनाने आश्‍वासनांची पूर्तता न केल्यास २१ फेब्रुवारीपासून ‘असहकार आंदोलन’ करण्यात येईल आणि त्याचे संपूर्ण दायित्व शासनाचे असेल…..

व्हॉट्सअ‍ॅपवर ‘पाकिस्तानकी जय हो’ स्टेटस ठेवणार्‍या शिवापूर (बेळगाव) येथील धर्मांध शिक्षिकेवर गुन्हा नोंद

पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी शिवापूर येथील खासगी शाळेतील जुलेखा महंमदरफिक ममदापूर या धर्मांध शिक्षिकेने ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर ‘पाकिस्तानकी जय हो’ असा ‘स्टेटस’ ठेवला. त्यामुळे या घटनेचे तीव्र पडसात उमटले असून संतप्त जमावाने धर्मांध महिलेच्या घरावर दगडफेक करून घराला आग लावण्याचा प्रयत्न केला.

‘राज्यघटनेत ‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य नाही’, असे सांगत प्रजासत्ताकदिनी ते न म्हणणार्‍या धर्मांध शिक्षकाला नागरिकांनी चोपले !

केवळ राज्यघटनेत नाही; म्हणून वन्दे मातरम् म्हणण्यास नकार देतांना ‘राज्यघटनेतील किती गोष्टी धर्मांध मानतात’, हे त्यांनी सांगायला हवे ! राज्यघटनेचा वापर सोयीनुसार करणार्‍या अशांना कारागृहात डांबले पाहिजे !

बारावी झालेेले विद्यार्थी शिक्षकांच्या मुलाखती घेत आहेत ! – शिक्षण समितीच्या बैठकीत शिवसेना सदस्यांचा आक्षेप

आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या धर्तीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळा’साठी (एम्आयईबी) मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या मुलाखती ‘मुक्तांगण’ या संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक समायोजन प्रक्रिये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार ! – परशुराम उपरकर, मनसे

ज्यांनी कधीही अध्यापनासाठी शाळेची पायरी चढली नाही, अशांना नवीन शिक्षक म्हणून नियुक्त्या दिल्या आहेत,असा आरोप मनसेचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

गणित चुकले म्हणून विद्यार्थ्याला काठीने मारणार्‍या शिक्षकाला अटक

गणित चुकले म्हणून आठवीच्या विद्यार्थ्याला काठीने मारणार्‍या ‘ट्रॉम्बे’ येथील शिक्षकाला अटक करण्यात आली. प्रदीप भंडारी (वय ३६ वर्षे) असे या शिक्षकाचे नाव असून तो खासगी शिकवणी घेतो.

चुकीचे समर्थन कशासाठी ?

सध्या सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होणारे सर्वच काही त्याज्य अथवा सर्व काही स्वीकारार्ह असते, असे नाही. प्रसारमाध्यमांनी समाजाला नेहमीच उपयुक्त असेच द्यायला हवे.

प्राध्यापिका अभ्यासावरून ओरडल्याने विद्यार्थ्याने त्यांचा क्रमांक अश्‍लील संकेतस्थळावर अपलोड केला

येथे एका ४० वर्षीय महिला प्राध्यापिकेचा भ्रमणभाष क्रमांक अश्‍लील संकेतस्थळावर टाकणार्‍या २४ वर्षीय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now