पालकांकडून शिक्षकाला चोप
रत्नागिरी – शहरातील बसस्थानकाच्या परिसरातील एका शाळेत प्रथमेश नवेले नामक शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. विद्यार्थिनीने पालकांना याविषयी सांगताच पालकांनी शाळेत जाऊन संबंधित शिक्षकाला चोप दिला. पालक शिक्षकाला चोप देत असतांना शाळेच्या एका शिपायाने पालकांना मारहाण केल्याचे समजते. संबंधित घटना समजताच संस्थेच्या पदाधिकारी शाळेत पोचले. त्यांनी तातडीने शिक्षकाला निलंबित केले. घटना समजताच पोलीसही याठिकाणी पोचले. त्यांनी संबंधित शिक्षकाला कह्यात घेतले असून मुलीसह पालकांनाही अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे.
संस्थेच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, शाळेत आजपर्यत असे गैरवर्तन घडलेले नाही. त्यामुळे संबंधित कृत्य करणार्या शिक्षकाला पाठीशी घातले जाणार नाही. संबंधित घटनेविषयी चौकशी करण्यात येणार आहे. शिपायाचीही चौकशी करणार असून आरोपात तथ्य आढळले, तर योग्य कार्यवाही करणार.
संपादकीय भूमिकाअसे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांचे केवळ निलंबन नव्हे, तर त्यांना कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे! |