जागृत हिंदूंचा रेटा !

इथे दिलेली उदाहरणे म्हणजे हिंदू जागृत झाल्यास काय घडू शकते ? याची झलकच आहे. हिंदू आता शांत न रहाता त्यांना जे जे अयोग्य वाटते त्याला निवेदन देणे, दूरभाषद्वारे निषेध नोंदवून, पत्र पाठवून, सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून विरोध करत आहेत. परिणामस्वरुप, अनेकांना त्यांची विज्ञापने पालटावी लागत आहेत !

फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांना अधिवक्ता आशुतोष दुबे यांच्याकडून नोटीस

या प्रकरणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सब्यसाची मुखर्जी यांना ‘२४ घंट्यांच्या आत संबंधित विज्ञापने न हटवल्यास गुन्हा नोंद करू’, अशी चेतावणी दिली होती. या चेतावणीनंतर मुखर्जी यांनी हे आक्षेपार्ह विज्ञापन मागे घेतले.

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना आंदोलनाची चेतावणी का द्यावी लागते ? याचाच अर्थ प्रशासनाला अवैध बांधकामावर कारवाई करण्याची इच्छा नाही. अशा भ्रष्ट आणि कामचुकार प्रशासनावरच प्रथम कारवाई करायला हवी !

ओडिशामध्ये हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकाला गावात येण्यास बंदी !

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंची कौतुकास्पद कृती ! हिंदु समाज सतर्क झाला, तर ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव हाणून पाडणे शक्य आहे, हे जाणा !

धर्मांधांनी काढलेला भगवा ध्वज हिंदूंनी एकत्र येऊन पुन्हा त्याच ठिकाणी फडकावला !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी भगवा ध्वज काढल्याचे प्रकरण

चिक्कमगळुरू दत्त पिठामध्ये हिंदु पुजार्‍याची नियुक्ती करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

एका हिंदु श्रद्धास्थानाच्या ठिकाणी हिंदु पुजारी नियुक्त करण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागतो, यावरून बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंची दुःस्थिती लक्षात येते !

ठाणे शहर पोलिसांनी श्री गणेशाची पोलिसाच्या वेशातील प्रतिकृती हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर हटवली !

हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नसल्याने देवतेचे मानवीकरण केल्याने पाप लागते, देवतेचा अवमान होतो, हे त्यांना लक्षात येत नाही ! त्यामुळे पोलीस प्रशासनासह सर्वत्र श्री गणेशाच्या चित्राचा वापर विविध कारणांसाठी केला जातो !

जुगाराचा खेळ असणारे ‘रमी गणेश प्रो’ अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरने हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू यांच्या विरोधाचा परिणाम !
हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी संघटित होऊन देवतांच्या अवमानाचा विरोध केल्यास त्याला ईश्‍वराच्या कृपेने यश मिळते, हेच यातून स्पष्ट होते !

कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी !

क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न

इतिहासप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी नोंदवलेल्या अभिप्रायानंतर गूगलने चुकीचा संदर्भ काढून टाकला !

गूगलने महाराणा प्रताप यांच्या इतिहासाच्या केलेल्या विकृतीकरणाचे प्रकरण
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताद्वारे केलेल्या आवाहनाचा परिणाम !