अफझलखान वधाच्या जिवंत देखाव्याला अंतत: पुणे पोलिसांची अनुमती !

संगम गणेश मंडळाने दिलेल्या आंदोलनाच्या चेतावणीचा परिणाम !

अफझलखान वध

पुणे – येथील संगम गणेश मंडळाने अफझलखान वधाचा जिवंत देखावा उभारण्यासाठी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे अनुमती मागितली होती; मात्र पोलिसांकडून ती नाकारण्यात आली होती. याविरोधात गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची चेतावणी दिली होती, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘ईमेल’ पाठवून ‘देखाव्यासाठी अनुमती मिळावी’, अशी विनंती केली होती. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही पोलिसांच्या या भूमिकेला प्रखर विरोध केला होता. विरोध वाढल्यावर कोथरूड पोलिसांनी अफझलखान वधाचा जिवंत देखावा उभारण्याची अनुमती मंडळाला दिली, तसेच ‘गणेशोत्सवाच्या अनुषंगाने दिलेल्या अटी-शर्थींचा भंग होणार नाही’, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांकडून मंडळाला करण्यात आले आहे. या गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी २६ ऑगस्टपासून अनुमती मिळवण्यासाठी उपोषणाला बसणार होते; मात्र याविषयावरील वाढता वाद पहाता पुणे पोलिसांनी अनुमती नाकारण्याचे पत्र मागे घेतल्याचे समजते.

वाचा संपादकीय : पोलिसांचे अफझलप्रेम ! 

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या संघटितपणाचाच हा परिणाम ! सर्वत्रचे हिंदू अशा प्रकारे संघटित झाले, तर हिंदूंच्या सण-उत्सवांना विरोध करण्याचे कुणाचेही धारिष्ट्य होणार नाही !