‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमामध्ये अनेक हिंदूंना धर्मांतरीत केल्याच्या घटनाही घडतात. ‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमाला अनुमती कोणत्या आधारावर दिली ?’ – हिंदु जनजागृती समिती

‘अयोध्या मंडपम्’ कह्यात घेण्याचा द्रमुक सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित !

सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात अयोध्या मंडपमचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. हिंदूंचे धार्मिक कार्यक्रम किंवा विवाह यांचे आयोजन करणारे सभागृह सरकार कसे कह्यात घेऊ शकते ?

म्हापसा येथील गणेशपुरी विश्‍वस्त मंडळावरून सलीम इसानी यांनी दिले त्यागपत्र

मुसलमान असल्याच्या सूत्रावरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर येथील उद्योजक सलीम इसानी यांनी गणेशपुरी, म्हापसा येथील श्री गणेशपुरी विश्‍वस्त मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे.

‘मलबार गोल्ड’चा हिंदुद्वेष !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात राहून ही आस्थापने, संघटना, संस्था हिंदुविरोधी कारस्थाने रचत असतांना त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याची कृती सर्वाेत्तम आहे. हिंदूंचा सन्मान विज्ञापनकर्ता, अभिनेते, अभिनेत्री, चित्रपट अथवा मालिका निर्माते यांनी राखणे आवश्यकच आहे, अन्यथा वैध मार्गाने विरोध ठरलेलाच आहे, हे निश्चित !

हिंदूंच्या विरोधानंतर ‘मलबार गोल्ड’कडून अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी टिकली लावलेले विज्ञापन प्रसारित !

अशा प्रकारे वरवरचा पालट केल्यानंतर हिंदूंचा विरोध मावळेल, या भ्रमात या आस्थापनाने राहू नये ! केवळ व्यावसायिक हानी होऊ नये, यासाठीच या आस्थापनाने क्षमायाचना न करता हा पालट केला असल्याने हिंदू अशा आस्थापनांवर बहिष्कारच घालतील, हे वेगळे सांगायला नको !

ज्ञानवापी मशिदीजवळील देवी श्रृंगार गौरीमातेची वर्षभर पूजा करण्याची अनुमती

ही मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही; कारण भारतात असे कुठेही नाही की, एका मशिदीच्या पश्‍चिम दिशेच्या बाजूने हिंदूंच्या देवतेची मूर्ती आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. औरंगजेब याने येथील काशी विश्‍वनाथ मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधली.

… ही लोकचळवळ व्हावी !

यातील देशविरोधी पात्राच्या तोंडी पुढील संवाद आहे, ‘देशातील शासन भले त्यांचे असले, तरी व्यवस्था ‘आमची’ आहे.’ इथेच सगळ्याचे मूळ आहे. ‘सध्याची प्रचलित आणि हिंदूंवरील अन्याय्य व्यवस्था दूर करणारी दुसरी सक्षम व्यवस्था निर्माण होणे’ हा सर्वंकष उपाय आहे’, हेच यावरून सिद्ध होते. ती व्यवस्था केवळ हिंदु राष्ट्रच देऊ शकते !

धर्मांध ख्रिस्त्यांचे धाडस जाणा !

तमिळनाडूतील शंकरानकोविल येथील मंदिराच्या मालकीच्या भूमीत एका ख्रिस्त्याचा मृतदेह दफन करण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला.

मंदिरांचे सरकारीकरण थांबवा !

वारंवार मागणी करूनही मंदिरांचे सरकारीकरण काही थांबत नाही. भाजप सत्तेत असलेल्या राज्यांतही मंदिरांचे सरकारीकरण होते, हे हिंदूंना रूचलेले नाही. त्यामुळे केंद्रीय स्तरावरच कायदा करून मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने हे लक्षात घेऊन यासाठी पावले उचलणे अपेक्षित आहे !

मंगलमय स्वस्तिक !

स्वस्तिकच्या प्रकरणात हिंदूंनी वेळीच आवाज उठवला नसता, तर कॅनडामध्ये त्याच्यावर बंदी घातली गेली असती. जागतिक पातळीवर हिंदूंना त्यांच्या अधिकारांसाठी वेळोवेळी लढावे लागते; मात्र हिंदूंमध्ये शुभ आणि मंगलमय असलेल्या स्वस्तिकसाठी हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला लढा हा नक्कीच आशादायी होता !