फतेहपूर येथे हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे हिंदूंच्या धर्मांतराचा ख्रिस्त्यांचा डाव उधळला !

फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथील सुजरही गावात २ जुलै या दिवशी ख्रिस्त्यांनी दलित हिंदूंच्या धर्मांतराचा डाव आखला होता. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन हा डाव उधळून लावला. यावेळी एका हिंदुत्वनिष्ठाने धर्मांतर करण्यास विरोध केल्याने ख्रिस्त्यांनी त्यास शिवीगाळही केली. पोलिसांना प्रकरणाची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोचले आणि रामचंद्र, संजय पासवान अन् नीरमती या तिघांना धर्मांतरविरोधी कायदा आणि अन्य कलमांखाली अटक केली. (हिंदु धर्म त्यागून ख्रिस्ती पंथ स्वीकारणारे हिंदू हे त्यांची नावे पालटत नाहीत, हे लक्षात घ्या ! अन्य हिंदूंचे धर्मांतर करता यावे, यासाठी ते असे करतात ! – संपादक) त्यांना ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

बजरंग दलाचे कार्यकर्ते राहुल विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘फतेहपूर जिल्ह्याच्या सुजरही गावात आयोजित एका कार्यक्रमात दलित हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. ख्रिस्त्यांनी कोणतीही अनुमती न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी बायबल वाटण्यात येत होते. एक आठवड्यापूर्वीच शिकारपूर क्षेत्रातही अशाच प्रकारे धर्मांतराचा कार्यक्रम आम्ही उधळून लावला होता.’

संपादकीय भूमिका

  • उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असूनही ख्रिस्त्यांकडून दिवसाढवळ्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. यावरून ख्रिस्ती किती उद्दाम झाले आहेत, हे दिसून येते !
  • मुळात हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच ते कावेबाज ख्रिस्त्यांच्या भूलथापांना बळी पडतात, हे लक्षात घ्या ! हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यासाठी आता उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ शासनाने स्वतंत्र नि सक्षम यंत्रणा उभारून देशासमोर नवीन आदर्श प्रस्थापित करावा, असेच हिंदु धर्मप्रेमींना वाटते !