डेहराडून (उत्तराखंड) येथील एका शाळेला ‘शुक्रवारी’ अर्धा दिवसाची सुटी देण्याचा प्रयत्न पालकांनी हाणून पाडला !

डेहराडून (उत्तराखंड) – येथील विकासनगरमध्ये असलेल्या ‘ब्राइट एंजेल पब्लिक स्कूल’मध्ये विद्यार्थ्यांना ‘शुक्रवार’च्या दिवशी नमाजासाठी अर्धा दिवस सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यास नागरिकांनी विरोध केल्यानंतर शाळेने हा निर्णय मागे घेतला. या शाळेचे व्यवस्थापक एम्.के. हुसेन, तर मुख्याध्यापक अजरा हुसेन हे आहेत.

२१ जुलैला विद्यार्थ्यांच्या दैनंदिनीमध्ये ‘प्रत्येक शुक्रवारी आता नमाजासाठी अर्धा दिवस सुटी असेल’, असे लिहिण्यात आले होते. पालकांना हे अयोग्य वाटल्याने त्यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना याची माहिती दिली. त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे याची तक्रार केली. जिल्हाधिकार्‍यांनी या निर्णयाची चौकशी करण्याचा आदेश दिला. मुख्याध्यापक अजरा हुसेन हे निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत, तर एम्.के. हुसेन यांना स्थानिक लोक ‘मेजर साहेब’ म्हणून संबोधतात. (सैन्यात अधिकारी असतांना अजरा हुसेन यांची वागणूक कशी होती, याचीही आता चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असेच लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

असे जागृत पालक सर्वत्र हवेत ! उत्तराखंडमधील भाजप सरकारने अशा शाळेच्या व्यवस्थापनाच्या विरोधात कारवाई केली पाहिजे !