सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस हा विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न ! – संजय राऊत, खासदार

केंद्रीय पडताळणी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांचा छळ चालू आहे. हे देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही यांना खड्ड्यात घालण्याचे काम करत असल्याचेही राऊत यांनी सांगितले. 

राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून दोन टप्प्यांत चौकशी

‘नॅशनल हेराल्ड’ नियतकालिकातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी करण्यात आली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग

सोनिया गांधी यांना ८ जून या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावले आहे; मात्र आता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ही चौकशी होणार कि नाही ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

‘नॅशनल हेराल्ड’ भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या आणि देशभरात जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसची राजकीय मृत्यूघंटा जवळ आली असल्याचेच हे द्योतक नव्हे का ?

काँग्रेस सर्वांत मोठा जातीयवादी पक्ष ! – काँग्रेसचे माजी नेते हार्दिक पटेल

हार्दिक पटेल हेही काही धुतल्या तांदुळासारखे नाहीत. पाटीदार समाजाच्या कथित हक्कांसाठी त्यांनी केलेले हिंसक आंदोलन जनता विसलेली नाही. काँग्रेसमध्ये राजकीय पोळी भाजता आली नाही; म्हणून त्यांनी पक्षत्याग केला आहे, हे जनता ओळखून आहे !

सर्वसमावेशक नेतृत्वच काँग्रेसला पुढे घेऊन जाऊ शकते ! – काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांचा सूर

काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर !
स्वतःचा पक्षही एकसंध राखू न शकणारी काँग्रेस देश एकसंध काय राखणार ?

गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडावे ! – काँग्रेस नेते कपिल सिब्बल

काँग्रेसच्या नेत्याने सांगितले आणि गांधी परिवाराने ते ऐकले, असे कधीतरी होईल का ? काँग्रेसमध्ये गेली ७५ वर्षे घराणेशाही मुरलेली आहे, ती सहजासहजी कशी संपणार ? ती काँग्रेससमवेतच संपेल आणि जनता तिला लवकरच संपवेल, हे मात्र निश्‍चित !

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांनी त्यागपत्र देण्यास काँग्रेस कार्यकारी समितीचा विरोध

याचाच अर्थ ‘भारत काँग्रेसमुक्त होईपर्यंत काँग्रेस गांधी परिवाराच्याच हातात रहाणार’, असाच होतो ! ‘काँग्रेस नामशेष होत चालली असतांनाही काँग्रेसी मात्र अजूनही गांधी घराण्याची ‘हांजी हांजी’ करण्यातच धन्यता मानतात’, हेच यावरून सिद्ध होते !

मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव कंत्राटदारांकडून घेतलेली टक्केवारी बनावट आस्थापनांच्या माध्यमातून इतरत्र वळवायचे ! – किरीट सोमय्या, भाजप

भाजपच्या किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद – महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

देहलीतील काँग्रेस मुख्यालयाचे १२ लाख ६९ सहस्र रुपयांचे भाडे थकित !

सरकारचे लाखो रुपयांचे भाडे थकित ठेवणार्‍या पक्षावर अद्याप केंद्र सरकारने कारवाई का केली नाही ?, याचे उत्तर त्याने जनतेला दिले पाहिजे ! सामान्य व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रमाणात भाडे थकवता आले असते का ? प्रशासनाने कधीच अशा व्यक्तीला बाहेर काढले असते !