काँग्रेसच्या मालकीच्या ‘नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राच्या मुख्यालयावर ‘ईडी’ची धाड

नवी देहली – काँग्रेसच्या मालकीच्या ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राच्या मुख्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) धाड टाकली. ‘नॅशनल हेराल्ड’मधील अपहाराच्या प्रकणी ‘ईडी’ने नुकतीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची कसून चौकशी केली होती. २ ऑगस्टला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी ‘नॅशनल हेराल्ड’च्या चौथ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात गेले. त्यानंतर बराच वेळ ते झाडाझडती घेत होते. ‘या झाडाझडीत ‘ईडी’ला काय मिळाले ?’, याचा तपशील मिळू शकला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी ‘नॅशनल हेराल्ड’च्या देहलीतील कार्यालयासह १२ ठिकाणी ‘ईडी’ने धाडी टाकल्या आहेत. यासह ‘ईडी’कडून कोलकाता येथेही काही ठिकाणी धाडी टाकल्या जाण्याची शक्यता आहे.