‘नॅशनल हेराल्ड’च्या आर्थिक अपव्यवहाराचे प्रकरण
नवी देहली – ‘नॅशनल हेराल्ड’च्या आर्थिक अपव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना नव्याने समन्स बजावले आहे. त्यांना २१ जुलैला संचालनालयासमोर चौकशीसाठी उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या मासात २३ जूनला संचालनालयाने गांधी यांना चौकशीसाठी बोलावले होते; परंतु ‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपस्थित रहाता येणार नाही’, असे सांगण्यात आले. गेल्या मासात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची याच प्रकरणात ५ दिवस चौकशी करण्यात आली होती.