पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट !
अमित शहा हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभांसाठी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौर्यावर होते.
अमित शहा हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उमेदवारांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभांसाठी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौर्यावर होते.
विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीच्या ४ पिढ्या आल्या, तरी आम्ही जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम मागे घेणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असून त्यांच्या नेतृत्वात भारत जगातील शक्तीशाली देश बनला आहे.
सांगली जिल्ह्यातील गडदुर्गांचा ऐतिहासिक संदर्भासह मागोवा घेणार्या श्री. महेश कदम लिखित ‘सांगली जिल्ह्यातील गड-कोट-वाडे’ या पुस्तकाचे प्रकाशन लोकमान्य टिळक स्मारक येथे नुकतेच करण्यात आले.
महायुती आणि महाविकास आघाडी यांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याने दोन्ही आघाड्यांतील नेत्यांना बंडखोरांचे मन वळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत. काही जागांवर एकाच नावाचे एकाहून अधिक उमेदवार उभे राहिल्याने लढत रंजक बनली आहे.
आरोपींकडून पोलिसांनी छोटा हत्ती वाहन मिळून ३.९६ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे, अशी माहिती येथील पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली.
जैन आर्थिक विकास महामंडळाची महाराष्ट्र सरकारने नुकतीच स्थापना केली आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नदीवेस गणपति मंदिर ट्रस्टच्या वतीने गणपति मंदिरासमोर वसुबारसचे आध्यात्मिक महत्त्व कथन करणारा धर्मशिक्षण फलक लावून पूजन करण्यात आले. पूजनानंतर बजरंग दलाच्या वतीने महाआरती करण्यात आली.
मंत्री अजित पवार म्हणाले की, मला अपर्कीत करण्याचा प्रयत्न झाला. इतक्या वर्षांत केवळ ४२ सहस्र कोटी रुपयांची कामे झाली होती, तरीही माझ्यावर ७० सहस्र कोटी रुपयांचा आरोप झाला. माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न झाला.
या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीला शिवाजी डोंगरे यांनी विरोध दर्शवला आहे. पक्षाशिवाय निवडणूक लढणार, असा निश्चय त्यांनी माधवनगर येथे झालेल्या बैठकीत केला होता.
सांगली विधानसभा मदारसंघातून पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती; मात्र जयश्री पाटील यांची मागणी फेटाळण्यात आली.