महाराष्ट्रात रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके वाजवण्यास बंदी !

राज्यातील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सूचनेनुसार वायूप्रदूषण करणारे फटाके विक्री करणे आणि वाजवणे, तसेच रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजवणे यांना बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर महापालिका आणि पोलीस यांचे लक्ष असेल.

तासगाव (जिल्हा सांगली) येथील हिंदु विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी ३ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

ग्राहक भावेश शहा आणि महापालिकेचे कर्मचारी नितीन आळंदे यांसह संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करा !

नियमबाह्य आणि अनधिकृत पद्धतीने पाणीपुरवठा करणारी नळ जोडणी करणार्‍या सर्व जणांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मिरज येथे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक !

विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी ऋषिकेश कुंभार या युवकास त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना नसल्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे.

सांगली येथे भाजपच्या वतीने आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहल किनीचे यांच्याकडे उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले.

आमदार सुधीर गाडगीळ आज उमेदवारी आवेदन प्रविष्ट करणार !

सांगली येथील भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ हे २४ ऑक्टोबर या दिवशी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर त्यांचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट करणार आहेत.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाळीव कुत्र्याची हत्या करणारा कह्यात ! ; कोंबड्यांच्या विष्ठेमुळे माशा वाढून विद्यार्थी आजारी !

पुणे येथे तरुणाने स्वतःच्या पाळीव कुत्र्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी त्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. तरुणाने कुत्र्याला फासावर लटकावून त्याला जिवे मारले.

सांगली येथे घरातून सोन्याचे दागिने पळवले

सांगली येथील जामवाडीमधील बंगल्यात घुसून दुसर्‍या मजल्यावरील कपाटात ठेवलेले ३ लाख ४० सहस्र रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने पळवले आहेत.

उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करण्याची पृथ्वीराज पाटील यांची चेतावणी !

काँग्रेस नेत्यांनी कुणाच्या दबावतंत्रामुळे घातकी निर्णय घेतला, तर हानी होणार आहे. पक्षाने ग्राऊंड अहवाल पहावा. पायावर धोंडा मारून घेऊ नये, असे आवाहन मराठा समाज संस्थेचे ए.डी. पाटील आणि माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी यांनी केले आहे.

सांगली येथे मुलांना मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिका शिंगाडे निलंबित !

विद्यार्थ्यांना मारहाण करणारे असे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ? अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांवर कुसंस्कार होतात !