सांगली, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – १७ मार्चच्या मोर्चाला उपस्थित राहू आणि या मोर्चात धारकर्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ‘शिवाजी विद्यापीठ’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी पू. भिडेगुरुजी यांची २८ फेब्रुवारीला भेट घेऊन त्यांना सविस्तर विषय सांगितला अन् मोर्चासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या प्रसंगी त्यांनी हे आवाहन केले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई आणि कोल्हापूर जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव यांच्यासह महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. संजय घाटगे, सनातन संस्थेचे श्री. आनंद पाटील उपस्थित होते.
मोर्चाला सर्वतोपरी साहाय्य करू ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

१७ मार्चला होणार्या मोर्चाच्या संदर्भात सर्वतोपरी साहाय्य करू, असे आश्वासन भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी दिले. मोर्चाच्या संदर्भात शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे खासदार श्री. महाडिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्यावर त्यांनी हे सांगितले.