गंगा नदीचे आध्यात्मिक सामर्थ्य
गंगा ही केवळ नदी नसून ती श्रेष्ठतम तीर्थदेवता आहे. त्यामुळे भारतियांसाठी गंगा प्राणांहूनही प्रिय ठरते. भाविकांची पापे धुण्याचे आध्यात्मिक कार्य ईश्वरानेच तिला वाटून दिलेले आहे. गंगा स्नानाने शुद्ध करते, तर नर्मदा नदी नुसत्या दर्शनानेच मानवाला शुद्ध करते.