क्रांतीकारकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवा ! – सौ. संपदा पाटणकर, सनातन संस्था

मुलांनी एकत्र येऊन प्रजासत्ताकदिन साजरा केला. यावेळी भारतमाता की जय, ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ! अशा घोषणा देण्यात आल्या.

स्वयंपूर्ण आणि भांगराळे (सोनेरी) गोवा यांसाठी सरकार कटीबद्ध ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

विकास आणि जागतिकीकरण यांच्या दृष्टीने गोवा संपूर्ण देशासमवेत हातात हात घालून पुढे जात आहे आणि तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात काढले.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा ! – हिंदु जनजागृती समिती

तिरंगा मास्क किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज हे देशप्रमाचे प्रदर्शन करण्याचे माध्यम नाही. उलट ध्वजसंहितेनुसार अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर करणे, हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे आणि हे राष्ट्रगौरव अपमान निवारण अधिनियम १९७१ चे उल्लंघन आहे.

देशात सर्वत्र ७२ वा प्रजासत्ताकदिन साजरा

देशात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. राजधानी देहलतील राजपथावर सैनिकांच्या संचालनासह विविध राज्ये आणि विभाग यांचे चित्ररथ दाखवण्यात आले.

‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालणे आणि राष्ट्रध्वजाचा मान राखणे या दोन विषयांसाठी जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने

प्रजासत्ताकदिनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि ‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालण्याविषयी जिल्ह्यातील भुसावळ, यावल, चोपडा, धरणगाव, एरंडोल येथील पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

गोकाक (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन आणि शिक्षण विभाग यांना निवेदन

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोकाक येथे तहसीलदार प्रकाश होल्लेप्पगोल आणि गटशिक्षण अधिकारी राठोड यांना निवेदन देण्यात आले.

बलसागर भारत होवो !

आज आपला देश संकटात आहे. पाकिस्तान, चीन, बांगलादेश आपल्या देशाचे लचके तोडण्यासाठी टपून बसले आहेत. युवकांनो, आपली मातृभूमी आज संकटात आहे. आज आपण होऊ तिचे मूल । झाली तरी चालेल मातृभूमीसाठी, आपल्या आयुष्याची चूल ॥

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आली त्याचा वृत्तांत . …

ध्वजसंहिता डावलून राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे मागणी

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि अवमान करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी प्रबोधन करा !

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याविषयी प्रबोधन करण्यासह ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्याविषयी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.