जिल्हाधिकार्यांशी बोलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्यांचे ध्वज जप्त करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देऊ ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप
हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे यांनी १० ऑगस्ट या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात निवेदन दिले. याच मागणीचे निवेदन भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवकर यांनाही देण्यात आले.