क्रांतीकारकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवा ! – सौ. संपदा पाटणकर, सनातन संस्था

मुलांना मार्गदर्शन करतांना सौ. संपदा पाटणकर

सांगली, २६ जानेवारी (वार्ता.) – स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतीकारकांनी त्यांचे प्राण वेचले. या त्यागाचे आपण नेहमी स्मरण ठेवले पाहिजे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचा ध्वज न वापरणे, तसेच तोंडावर राष्ट्रध्वज काढणे अशा कृती आपण टाळणे आवश्यक आहे. आजच्या दिवसात आणि उद्या मुलांना कुठेही राष्ट्रध्वज रस्त्यावर पडलेला आढळल्यास लगेच तो उचलून एकत्रितरित्या राष्ट्रध्वज संहितेप्रमाणे त्याचे निर्गतीकरण करावे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या साधिका सौ. संपदा अमित पाटणकर यांनी केले.

गावभाग येथील जोशी गल्ली, चैतन्य चौक येथे तेथील मुलांनी एकत्र येऊन प्रजासत्ताकदिन साजरा केला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी संपूर्ण वन्दे मातरम् म्हणण्यात आले. या प्रसंगी भारतमाता की जय, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् । अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. अमित पाटणकर उपस्थित होते.