हिंदुत्वनिष्ठांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलने अन् निवेदने

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी अनेक वर्षे हिंदु समाजाची नि:स्वार्थ भावाने सेवा केली आहे. अशी व्यक्ती कधी चुकीचे कृत्य करू शकत नाही. अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करून केंद्रीय अन्वेषण विभागाने एकप्रकारे हिंदुत्वाला उघड आव्हान दिले आहे, असे आम्ही समजतो.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या अटकेच्या निषेधार्थ वर्धा येथे शासनाला निवेदन

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर अन् परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना लेल्या अटकेच्या निषेधार्थ हिंजसच्या कार्यकर्त्यांनी २७ मे या दिवशी वर्धा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैणे आणि नगराध्यक्ष अतुल तराळे यांना निवेदन दिले.

जळगाव येथे निर्दोष रणझुंजार अधिवक्ता पुनाळेकर यांना त्वरित मुक्त करण्यासाठी आंदोलन आणि निवेदन !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केल्याचा जोरदार निषेध जळगाव येथे आंदोलनाद्वारे करण्यात आला.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिली कल्याण येथे आमदारांना निवेदने

प्रखर राष्ट्रप्रेमी, निडर अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने केलेल्या अन्याय्य अटकेच्या विरोधात कल्याण येथे भाजपचे आमदार नरेंद्र पवार, तसेच कल्याण पूर्वचे आमदार श्री. गणपतशेठ गायकवाड यांना भेटून हिंजसच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

अमरावती येथे नवनिर्वाचित खासदार सौ. नवनीत राणा आणि आमदार रविभाऊ राणा यांना निवेदन

येथील नवनिर्वाचित खासदार सौ. नवनीत राणा यांची लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी २६ मे या दिवशी सदिच्छा भेट घेतली.

अमळनेर (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन !

येथे पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा आणि श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, याविषयी अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरराव यांना निवेदन देण्यात आले.   

खाद्यतेलाच्या डब्यांवरील देवतांच्या चित्रांमुळे होणारी विटंबना रोखण्यासाठी दहिसर (मुंबई) येथील धर्मप्रेमींकडून निवेदन !

निवेदन स्वीकारल्यानंतर व्यवस्थापक भावेश जगरा यांनी खाद्यतेलाचे डबे, बाटल्या आणि पिशव्या यांवरील देवतांची चित्रे लवकरात लवकर काढण्याचे आश्‍वासन दिले.

जिहादी आतंकवादाचे समर्थक डॉ. झाकीर नाईक यांच्या संघटनेवर बंदी; मग त्यांच्या फेसबूक खात्यावर का नाही ? – हिंदु जनजागृती समिती

डॉ. झाकीर हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे जर भारत सरकारचे म्हणणे आहे, तर त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेच्या फेसबूक खात्यांवर सरकारने आजही बंदी का घातली नाही ? त्यांच्या संघटनेवर घातलेली बंदी ही दिखाऊपणाच म्हणावा लागेल !

श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करा !

दरवाढ रहित करून हिंदूंना विनामूल्य आरती करण्यास द्यावी, तसेच असा निर्णय घेऊन भक्तांची लुट करणारे ‘श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड’ विसर्जित करून प्रशासक नेमावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाने हिंदूंच्या ‘गुढीपाडवा’ या नववर्षाच्या दिवशी ठेवलेली प्रवेशपरीक्षा पुढे ढकलावी !

केंद्रशासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने हिंदूंच्या ‘गुढीपाडवा’ या हिंदु नववर्षाच्या (६ एप्रिल) दिवशी ठेवलेली प्रवेशपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ एप्रिलला पाठवण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF