‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामविस्तारासाठी विद्यापिठाच्या कुलगुरूंना निवेदन !

प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे कुलगुरूंचे आश्वासन !

कोल्हापूर, ५ मार्च (वार्ता.) – कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु राष्ट्र समन्वय समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांना निवेदन देण्यात आले. ‘प्रक्रियेनुसार नामविस्ताराचा हा निर्णय शासन स्तरावर होतो. शासन स्तरावरून या संदर्भात जेव्हा आम्हाला विचारणा होईल, तेव्हा याविषयी आम्ही योग्य तो प्रस्ताव शासनाकडे पाठवू’, अशी ग्वाही कुलगुरु यांनी शिष्टमंडळास दिली.

या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. महादेव यादव महाराज, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर सहजिल्हासंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. महादेव यादव महाराज म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आपणा सर्वांसाठीच आदर्श आणि वंदनीय असून कुलगुरूंच्या कार्यकाळात हा नामविस्तार झाल्यास आनंदच वाटेल.’’