उत्तर कोरियामध्ये घरामध्ये अश्‍लील चित्रपट पहाणार्‍या मुलामुळे संपूर्ण कुटुंबाला तडीपाराची शिक्षा !

भारतात अशा प्रकारच्या कठोर शिक्षा होत नसल्यानेच अश्‍लीलतेचे प्रमाण वाढत आहे, हे लक्षात घ्या !

पुणे शहरापेक्षा पुणे ग्रामीणमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे अधिक असल्याचा ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’चा अहवाल

राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ४८ टक्के असतांना महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ १३ टक्के आहे.

भूमीच्या अतिक्रमणावरून मेजर जनरल आणि मालमत्ता अधिकारी यांना कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या कारावासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

केंद्रशासनाने वीर राघव रेड्डी यांच्या विरुद्ध सैन्याच्या ९ एकर भूमीवर अतिक्रमण करून ती बळकावली आहे, असा दिवाणी दावा केला.

देहलीतील बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी आतंकवादी आरिज खान याला फाशीची शिक्षा !

वर्ष २००८ च्या प्रकरणातील आतंकवाद्यांच्या संदर्भातील खटल्याचा निकाल १३ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे अन्याय ! आतंकवाद निपटण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये तात्काळ न्याय मिळणे जनतेला अपेक्षित आहे !

फाशीची चिंता नाही ?

चोर-दरोडेखोरांना ठाऊक असते की, ‘फार काय करतील, २-४ वर्षे आत रहावे लागेल इतकेच !’ आणि आता तर बलात्कारी अन् खुनी यांनाही कळून चुकले आहे की, ‘फाशी वगैरे काही लगेच होत नसते !’ ज्याचा धाक असायला हवा, त्यातीलच हवा निघून गेली आहे ! सगळ्यांना मोकळे रान मिळाले आहे, असेच तर यातून दिसून येत नाही ना ?

गोपालगंज (बिहार) येथील विषारी दारूच्या प्रकरणी ९ जणांना फाशी, तर ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा

खजूरबानी येथे वर्ष २०१६ मध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू, तर ६ जण आंधळे झाल्याच्या प्रकरणी गोपालगंजमधील न्यायालयाने ९ आरोपींना फाशीची आणि ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

सर्कोझी आणि व्यवस्था !

​भारत महासत्तेच्या दिशेने पावले टाकत आहे. यासाठी भारतात बोकाळलेला भ्रष्टाचार हा मोठा अडसर आहे. विकसित देश तो निपटण्यासाठी काय करतात, याचा अभ्यास हवा आणि त्या अभ्यासातून पुढे आलेल्या सूत्रांची कार्यवाही करण्यासाठी धडाडीही दाखवायला हवी. असे केले, तरच भ्रष्ट राजकारण्यांवर वचक बसेल.

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सर्कोझी यांची बाजू मांडणारे वकील आणि न्यायाधीश हेही दोषी ! भारतात एवढ्या उच्चपदांवर कार्यरत असणार्‍या भ्रष्ट राजकारण्यांना कधी अशी शिक्षा होते का ?

भारतात सर्वत्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांत होणारी भेसळ अन् त्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा

‘वर्ष २०११ मध्ये भारतात ‘दूध भेसळ राष्ट्रीय सर्वेक्षण’तर्फे एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात भारतात विक्री होणार्‍या एकंदर दुधापैकी ६८ टक्के दूध हे भेसळयुक्त असल्याचे आढळून आले.

देशात कोरोनाचा संसर्ग पसरवला ! – परदेशी तबलिगींची न्यायालयात स्वीकृती

तबलिगी जमातच्या लोकांनी देशातील दळणवळण बंदीचे उल्लंघन करत देशभरात विविध ठिकाणीच्या मशिदींमध्ये प्रवास केल्याने कोरोनाचा संसर्ग देशात झाला होता.