फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

सर्कोझी यांची बाजू मांडणारे वकील आणि न्यायाधीश हेही दोषी !

भारतात एवढ्या उच्चपदांवर कार्यरत असणार्‍या भ्रष्ट राजकारण्यांना कधी अशी शिक्षा होते का ?

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सचे ६६ वर्षीय माजी राष्ट्रपती निकोलस सर्कोझी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सर्कोझी या प्रकरणी वरच्या न्यायालयात आव्हान देऊ शकतात.

सर्कोझी यांनी वर्ष २००७ मध्ये निवडणूक प्रचाराच्या काळात काळा पैसा घेतल्याच्या प्रकरणात चौकशी करणार्‍या न्यायाधिशाला उच्चपदाची नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून या प्रकरणातील गोपनीय माहिती मिळवली होती. या प्रकरणात सर्कोझी यांची बाजू मांडणारे वकील आणि निवृत्त न्यायाधीश यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. फ्रान्समध्ये माजी राष्ट्रपतींना शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही माजी राष्ट्रपती जैक्स चिराक यांना एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.