देहलीतील बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी आतंकवादी आरिज खान याला फाशीची शिक्षा !

  • फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतरही आतंकवाद्यांना तात्काळ फाशी दिली जात नाही, हा आतापर्यंतचा अनुभव आहे ! ‘या प्रकरणातही तसे होऊ नये’, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
  • वर्ष २००८ च्या प्रकरणातील आतंकवाद्यांच्या संदर्भातील खटल्याचा निकाल १३ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे अन्याय ! आतंकवाद निपटण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये तात्काळ न्याय मिळणे जनतेला अपेक्षित आहे !
आतंकवादी आरिज खान

नवी देहली – देहली न्यायालयाने बाटला हाऊस येथील चकमकीच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी आरिज खान याला फाशीची शिक्षा ठोठावली. ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’ असे सांगत न्यायालयाने हा निर्णय दिला. या चकमकीत देहली पोलीस दलातील पोलीस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर आरिज खान याने गोळीबार करत तेथून पलायन केले होते, असे न्यायालयाने म्हटले.

१३ सप्टेंबर २००८ या दिवशी ही चकमक झाली होती. त्यानंतर १० वर्षे आरिज खान पसार होता. त्याला फेब्रुवारी २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती.

काँग्रेसने चकमकीला ठरवले होते बनावट !

बाटला हाऊसमध्ये झालेल्या पोलीस आणि आतंकवादी यांच्यातील चकमकीला काँग्रेसने बनावट ठरवले होते. यात ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या प्रती दुःख व्यक्त केले होते. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते की, मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांची छायाचित्रे पाहून सोनिया गांधी यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. (काँग्रेसच्या अशा आतंकवादी प्रेमामुळेच पुढे जनतेने त्यांना केंद्र आणि देशातील अनेक राज्यांतून सत्ताच्युत केले. ‘सुंभ’ जळाला असला, तरी काँग्रेसचा आतंकवादीप्रेमाचा ‘पिळ’ अद्याप कायम असल्याने या फाशीवर ती मौन बाळगून आहे ! – संपादक)