तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अकाऊंट बंद

  • तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचाही ‘व्हॉट्सअ‍ॅप’ न वापरण्याचा निर्णय

  • स्वदेशी अ‍ॅपचा वापर ! 

अमेरिकी अ‍ॅप बंद करून स्वदेशीचा आग्रह धरणार्‍या तुर्कस्ताच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय नेते आणि जनता काही शिकतील का ?

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगन

अंकारा (तुर्कस्तान) – ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने खासगी माहितीच्या संदर्भातील धोरणांमध्ये पालट केला असून या नवीन धोरणांमधील अटी मान्य नसतील, तर वापरकर्त्याचे खाते (अकाऊंट) बंद करण्यात येईल, असे व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले आहे. जर व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन अटी आणि धोरणे यांना संमती दिली, तर वापरकर्त्याची संपूर्ण खासगी माहिती फेसबूकसहित आस्थापनाची अन्य संकेतस्थळे किंवा अ‍ॅप यांवर शेअर (प्रसारित) केली जाईल. यामुळे वापरकर्ते चिंतेत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगन यांच्या प्रसारमाध्यमांच्या संदर्भातील विभागाने राष्ट्र्राध्यक्षांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’चे खाते बंद करत असल्याची घोेषणा केली आहे. तसेच तुर्कस्तानच्या संरक्षण मंत्रालयानेही ‘यापुढे आम्ही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार नाही’ असे घोषित केले आहे. ‘व्हॉट्स्अ‍ॅप ऐवजी आता ‘बीप’ या स्वदेशी अ‍ॅपवर एर्दोगन काम करणार आहेत’, अशी माहितीही देण्यात आली आहे. ‘बीप’ हे तुर्कस्तानमधील एक ‘इनस्क्रिप्टेड अ‍ॅप’ असून या अ‍ॅपची मालकी ‘तुर्कसेल इलेटिसिम हिजमेटलेरी एएस्’ या तुर्कस्तानमधील आस्थापनाकडेच आहे.