वर्ष १९४९ मध्ये विख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी प्रयागच्या एका विज्ञान महाविद्यालयात दीक्षान्त भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित केले, ‘विद्यार्थीमित्रांनो, आपण कुठूनतरी काही गोष्टींची आयात करतो, तेव्हा आपण केवळ आपल्या अज्ञानाचीच किंमत मोजतो असे नाही, तर आपल्या अकार्यक्षमतेचे मोलही चुकते करतो.’’
(संदर्भग्रंथ : भारताची उज्ज्वल विज्ञान-परंपरा. लेखक – सुरेश सोनी. अनुवाद – डॉ. क. कृ. क्षीरसागर.)
स्वदेशीचा अभिमान, हा राष्ट्राभिमानाचा पायाही आहे ! यासाठी आजपासूनच निर्धार करूया, ‘यापुढे कोणतीही विदेशी वस्तू, मग ती कितीही स्वस्त वा आकर्षक असली, तरी ती खरेदी करून मी माझा स्वाभिमान, राष्ट्राभिमान गहाण टाकणार नाही !
(वाचा : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !’)