परशुराम, अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण करा ! – हर्षद खानविलकर

आता आपल्यालाच राष्ट्राभिमान जागवण्याची आवश्यकता आहे. २६ जानेवारीनिमित्त शौर्यजागृती करण्याची आवश्यकता आहे. शारीरिक, मानसिक यांसह आपल्याला बौद्धिक आणि आध्यात्मिक बळही वाढवायचे आहे.

शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा नोंद

शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते.

राष्ट्ररक्षणाचे धडे देऊन राष्ट्रप्रेमी युवा पिढी सिद्ध केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान 

हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर म्हणाले की, क्रांतीकारकांनी घराची होळी करून, घरावर तुळशीपत्र ठेवून, संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले आहे; परंतु आता सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

नेताजी बोस यांच्या कार्यक्रमात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणे अयोग्यच ! – रा.स्व. संघ

ज्या लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या ते नेताजींचाही सन्मान करत नाहीत आणि त्यांना ‘श्री रामा’विषयीही आस्था नाही. या प्रकरणामध्ये घोषणा देणार्‍या व्यक्तींचा शोध घेताला जावा, अशी मागणी संघाने भाजपकडे केली आहे.

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये ? जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी न्यायालयात केली पाहिजे.

हम दो हमारे पांचचा संकल्प करून मुलांना शस्त्र विकत घेऊन चालवायला शिकवा ! – भाजपच्या नेत्याचे आवाहन

हिंदूंची संख्या वाढवून समस्या सुटणार नाही, तर हिंदू संख्येने अल्प असले, तरी त्यांना ईश्‍वराचे अधिष्ठान असले, तरी ते धर्मांध शक्तींमुळे निर्माण झालेल्या संकटांना पुरून उरतील, हेच खरे !

यापेक्षा समान नागरी कायदा करा !

जोपर्यंत कुटुंबनियोजनाच्या संदर्भातील नियम बनवला जात नाही, तोपर्यंत आपण हम दो हमारे पांचचा संकल्प केला पाहिजे, असे विधान भाजपचे नेते विनीत अग्रवाल शारदा यांनी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.

आता डोळ्यांना न दिसणार्‍या शत्रूसमवेत आपले युद्ध चालू झाले आहे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्याच साधनांचा वापर करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत आहे. जगात कुठेही बसून घरातील माहिती, पैसे आणि अन्य गोष्टींची चोरी या माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल !