|
मेरठ (उत्तरप्रदेश) – जोपर्यंत कुटुंबनियोजनाच्या संदर्भातील नियम बनवला जात नाही तोपर्यंत आपण ‘हम दो हमारे पाच’चा संकल्प केला पाहिजे. जोपर्यंत कुटुंबनियोजनाचा ठोस नियम सिद्ध केला जात नाही, तोपर्यंत ‘हम दो हमारे दो’चा सिद्धांत संपवला पाहिजे, असे विधान भाजपच्या व्यापार विभागाचे उत्तरप्रदेशमधील संयोजक विनीत अग्रवाल शारदा यांनी येथे प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपा नेत्याचं आवाहनhttps://t.co/SiEV1y5bs8#BJP pic.twitter.com/jADGfNmFtE
— Lokmat (@MiLOKMAT) January 27, 2021
शारदा यांनी म्हटले की,
१. या ५ मुलांपैकी सर्वाधिक शिकलेल्या मुलाला राजकारणात पाठवावे. एका मुलाला मान, मर्यादा आणि प्रतिष्ठा यांचे संरक्षण करण्यासाठी हत्यार खरेदी करणे आणि ते चालवणे शिकवावे. एका मुलाला भारतीय सैन्यात पाठावे. एकाला व्यापारी करावे आणि एका मुलाला आय.ए.एस्. किंवा पी.सी.एस्. बनवून भारतियांच्या सेवेसाठी सक्षम करावे.
२. महाराज दशरथ यांना ४ पुत्र नसते, तर आजही रावणाचे राज्य संपुष्टात आले नसते. त्यामुळेच देशात ‘हम दो हमारे पाच’ची आवश्यकता आहे. असे झाले नाही, तर भारतमाता पुन्हा एकदा रडेल. भारतमाता पुन्हा एकदा बेड्यांमध्ये अडकेल आणि पुन्हा एका पाकिस्तानची मागणी केली जाईल. त्यामुळेच भारत मातेला नमन करतांना मी ‘हम दो हमारे पाच’चे समर्थन करतो.