ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवण्याची मुसलमान पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली

‘हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

पाणी प्रदूषित झाल्याने मडगाव (गोवा) येथील पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनस्थळ पालटले ! Ganesh Visarjan

प्रदूषित पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन न करता मूर्तीचे पावित्र्य टिकवणार्‍या पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे ‘शिवशस्‍त्रशौर्य’ प्रदर्शनात पहाता येणार !

सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नागपूर येथील मध्‍यवर्ती संग्रहालय, कोल्‍हापूर येथील ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ आणि मुंबईमधील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्‍तूसंग्रहालय’ या ठिकाणी ही वाघनखे जनतेला पहाण्‍यासाठी ठेवण्‍यात येणार आहेत.

सरकारने कुणाच्याही परंपरांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये ! – सर्वोच्च न्यायालय

देशातील मंदिरांचे होणारे सरकारीकरण थांबवून सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कायदा करावा, अशीच देशातील हिंदूंची अपेक्षा आहे !

नवी मुंबईमध्ये ६३ वर्षे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा कायम राखणारे आग्रोळी गाव ! Ganeshotsav

गणेशोत्सवाच्या या काळामध्ये १० दिवस मंदिरात संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे वावरत असते. आजही गावामध्ये ‘एक गाव एक गणपति’प्रमाणे ‘एक गाव एक होळी’, ‘एक गाव एक दहीहंडी’, तसेच अन्य सर्व उत्सव एकत्रपणे साजरे केले जातात.

‘सनातन प्रभात’ हे हिंदूंचे व्यासपीठ ! – भरत राऊळ, ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी

‘सनातन प्रभात’ हे बीजरूपात कार्य करणारे वृत्तपत्र आहे. जे विषय ‘सनातन प्रभात’ने मांडले, त्या विषयांनी पुढे आंदोलनाचे स्वरूप घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनखे सातारा येथे आणणार ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

वाघनखे वर्ष १८२४ मध्‍ये इंग्रजांनी लंडनला नेली. १९९ वर्षानंतर आता ही वाघनखे पुन्‍हा भारतात येणार आहेत. पुढील केवळ ३ वर्षे हा अनमोल ठेवा भारतात रहाणार आहे.

श्रीराममंदिराच्या खोदकामात सापडले आहेत देवतांच्या मूर्ती आणि स्तंभ !

यामध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आणि स्तंभ दिसत आहेत. याविषयीची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. श्रीराममंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाच्या वेळी सापडलेले अवशेष  दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.

आजपासून भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे जवळून दर्शन घेता येणार ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

कोरोना महामारीच्‍या काळापासून गेले ३ वर्षे साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन पितळ्‍या उंबर्‍यातून आतून बंद करण्‍यात आले होते. हे दर्शन २९ ऑगस्‍टपासून भाविकांना चालू करण्‍यात येत आहे.

देवगड (सिंधुदुर्ग) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू !

मंदिरात वस्त्रसंहिता लागू केल्याविषयी श्री देव कुणकेश्वर देवस्थान समितीचे अभिनंदन ! हिंदु संस्कृतीचे रक्षण व्हावे आणि मंदिराचे पावित्र्य जपले जावे, यासाठी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत असल्याचे देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.