अखेर सांगली येथील वटवृक्षाच्या कट्ट्यावरील ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके महापालिकेने हटवले !

वटपौर्णिमेला शेकडो महिलांकडून वटवृक्षाची मनोभावे पूजा !

वटवृक्षाची मनोभावे पूजा करतांना महिला वर्ग !

सांगली, २१ जून (वार्ता.) – येथील स्टेशन रस्त्यावरील एस्.एफ्.सी मॉल जवळील वटवृक्षाच्या कट्ट्यावर अनधिकृत बसवलेले आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे ‘मॉडर्न चिकन ६५’चे अनधिकृत खोके (स्टॉल) अखेर महापालिकेने गाळेधारकाला सांगून हटवले आहे. खोके हटवतांना भाजपच्या सरचिटणीस आणि अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे उपस्थित होत्या. वटवृक्षाला अतिक्रमणमुक्त केल्यानंतर २१ जून या दिवशी महिलांनी वटपौर्णिमा आनंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरी केली. हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे आणि अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हा वटवृक्ष अतिक्रमणमुक्त झाला. (हिंदुत्वनिष्ठांनी पाठपुरावा केला नसता, तर हा वटवृक्ष मुक्त झालाच नसता ! – संपादक)

आनंदाने आणि मोठ्या उत्साहात वटपौर्साणिमा साजरी करणारा महिला वर्ग !

त्या वटवृक्षाचा कट्टा फोडून महापालिकेची अनुमती न घेता अनधिकृतपणे ‘मॉडर्न चिकन ६५’चे खोके बसवण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्या वटवृक्षाची पूजा करून महिलांना फेर्‍या मारणे अशक्य होते; परंतु आता वडाच्या झाडाला लागून अतिक्रमण केलेले खोके हटवल्यामुळे हिंदु महिलांनी २१ जून या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेला वटवृक्षाचे मनोभावे पूजन केले. या वेळी महिलांनी फुगड्या घालत सण साजरा केला. यासमवेत जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.

निदर्शने करतांना माजी आमदार नितीन शिंदे (मध्यभागी), वारकरी अन् हिंदुत्वनिष्ठ

या संदर्भातील सविस्तर वृत्ते वाचा –

https://sanatanprabhat.org/marathi/805556.html
https://sanatanprabhat.org/marathi/805999.html


या वेळी महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांचा नितीन शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, सुनंदा राऊत, सुनीता इनामदार, मनीषा सातपुते, रोहिणी मंगल, ललिता कांबळे आदी महिला उपस्थित होत्या. प्रत्यक्ष जागेवर जाऊन खोकेधारकाकडून हे खोके हटवल्यानंतर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि विठ्ठल मंदिर विश्वस्त यांनी माजी आमदार नितीन शिंदे, अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, तसेच हिंदु एकता आंदोलनाचे कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.