Modi Inaugurates Nalanda : पुस्तके जळाली, तरी ज्ञान नाहीसे होत नाही ! – पंतप्रधान मोदी

नालंदा विद्यापिठाचे नवे स्वरूप देशाला समर्पित !

नालंदा विद्यापिठाचे उद्घाटन

नालंदा (बिहार) – ‘नालंदा’ हे केवळ नाव नाही, तर एक ओळख आहे. नालंदा हे मूल्य, मंत्र, अभिमान आणि एक कथा आहे.  अग्नीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जळू शकतात; परंतु या ज्वाला ज्ञानाचा नाश करू शकत नाहीत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापिठाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर काढले.

‘पंतप्रधानपदाची तिसर्‍यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसांत मला नालंदा येथे येण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे.

नालंदा विद्यापिठ

‘भारताच्या विकासाच्या प्रवासाचे हे एक चांगले लक्षण आहे’, या दृष्टीने मी याकडे पहातो’, असेही ते या वेळी म्हणाले. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेही उपस्थित होते.