जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या भाजप सरकारने राज्यातील मंदिरांच्या पुनरुज्जीवनासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे. राज्यातील सीकर येथील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशभरातून कोट्यवधी भाविक येथे येतात. या मंदिरात भाविकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. काशी विश्वानाथ आणि उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर येथील सुसज्ज मार्गानुसार (कॉरिडॉरनुसार) येथे विकास केला जाईल.
याखेरीज राजस्थानातील प्रसिद्ध जीनमाता मंदिराचाही विकास करण्यात येणार आहे. शाकंभरी मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. राज्यातील ६०० मंदिरांसाठी १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिवाळी आणि श्रीरामनवमी सणानिमित्त मंदिरे सजवली जाणार आहेत.
संपादकीय भूमिकासरकारने मंदिरांचे सरकारीकरण केले असेल, तर तेही रहित करून मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात दिली पाहिजेत ! |