|
जळगाव – गोवंश हत्या करणे आणि अवैध मांस बाळगणे यांप्रकरणी धर्मांधांच्या तावडीतून पोलीस अन् अधिवक्ते यांचे संरक्षण करणार्या ४ हिंदुत्वनिष्ठांवर खोटा गुन्हा नोंदवून त्यांना अडकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता; मात्र तो आक्रमक हिंदू आणि अधिवक्ते यांनी हाणून पाडला.
१. गोवंश हत्या करणे आणि अवैध मांस बाळगणे यांप्रकरणी पोलिसांनी ७ धर्मांधांना अटक केली होती. त्यांना २१ जून या दिवशी जिल्हा न्यायालयात उपस्थित केल्यावर संशयितांचे वकीलपत्र घेतल्याच्या कारणावरून हिंदु-मुसलमान अधिवक्त्यांमध्ये वाद झाला.
२. १ ते दीड सहस्र मुसलमानांचा जमाव न्यायालयाच्या आवारात हिंदु अधिवक्त्यांशी भिडला. समोरासमोर येऊन एकमेकांवर आरडाओरड केल्याने तणाव निर्माण झाला.
३. २० आणि २१ जून या दोन्ही दिवशी शहरातील मुसलमानबहुल भागातून मोठ्या संख्येने धर्मांधांना बोलावण्यात आले होते. आरोपींना न्यायालयात आणल्यावर त्यांनी घोषणा देत गोंधळ घातला.
४. पोलीस निरीक्षक संदीप गावित न्यायालयात आल्यानंतर पोलिसांनी धर्मांधांवर लाठीमार करायला प्रारंभ केला. न्यायालयाकडे येणार्या मुख्य रस्त्याच्या चौकातील मुसलमानांना हिंदूंनी हाकलले.
५. शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोटी तक्रार करून त्यांना अडकवण्याचे कारस्थान धर्मांधांकडून चालू होते. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना हातवारे करून आणि घोषणा देऊन धमकावले जात होते. (न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी असे अपप्रकार करणार्या धर्मांधांवर पोलीस कारवाई कधी करणार ? – संपादक) त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते अधिवक्त्यांच्या संरक्षणासाठी आले होते.
६. पोलीस निरीक्षक संदीप गावित येताच धर्मांधांनी खोटे सांगितले, ‘‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे श्री. यशाजी चव्हाण, श्री. राजू भाऊ नन्नवरे आणि श्री. राघव दोरकर यांनी आम्हाला धक्काबुक्की केली, तसेच श्री. यशाजी यांनी पोलिसांच्या हातून काठी घेऊन आमच्या मुसलमान लोकांना मारहाण केली.’’ या वेळी पोलीस निरीक्षक संदीप गावित यांनी निश्चिती न करता वरील ३ हिंदुत्वनिष्ठांना ‘तुमचे अती झाले. तुम्ही कायद्यात रहा. नाहीतर जड जाईल’, अशी आगपाखड केली.
७. अधिवक्त्यांनी सांगितले, ‘‘हे तरुण आमच्या समवेतच असल्याने ते पोलिसांच्या हातातून काठी घेऊन कसे मारतील ? पोलीस त्यांच्या काठ्या कुणालाही देतील का ? श्री. यशाजी यांनी धर्मांधापासून पोलिसांचे रक्षणच केले आहे.’’ तरीही पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले आणि हिंदुत्वनिष्ठांना धक्काबुक्की केली. हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ते यांनी ‘सीसीटीव्ही पाहिल्यावर तुम्हाला सत्य-असत्य लक्षात येईल’, असे सांगितले. तरीही पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात नेले.
८. एक धर्मांध खोटी तक्रार देत होता. हिंदुत्वनिष्ठांनी त्याला सांगितले, ‘सीसीटीव्ही’ची पडताळणी केल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. आम्ही तुला मारले नाही, तरी तू खोटी तक्रार देत आहेस. आम्हीपण तुझ्या विरोधात तक्रार देऊ.’ हे ऐकताच त्याने तक्रार देत नसल्याचे पोलिसांना सांगितले; पण पोलिसांनी तक्र्रार देण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावला.
९. ‘पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठ श्री. यशाजी चव्हाण यांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे’, हे हिंदुत्वनिष्ठांच्या लक्षात आले. शहर पोलीस ठाण्यात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता निरंजन चौधरी तक्रार प्रविष्ट करून बाहेर पडले; मात्र पोलिसांनी श्री. यशाजी यांना तेथेच थांबण्यास सांगितले. हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ते यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप गावित यांना घटनाक्रम सांगितला. हिंदुत्वनिष्ठांची ठाम भूमिका आणि अधिवक्त्यांची संघटित शक्ती, यांमुळे पोलिसांनी यशाजी चव्हाण यांना सोडले.
संपादकीय भूमिका
|