|
रांची (झारखंड) – जेथे लोकसभा मतदारसंघात भाजपला ६० टक्क्यांंहून अधिक मते मिळतील, तेथे ५० लाख ते १ कोटी रुपये खर्च करून ‘नमो भवन’ बांधले जाईल. तसेच ज्या ठिकाणी हिंदूंना मुसलमानांकडून त्रास दिला जातो आणि तेथे भाजपला अधिक मतदान होते, तेथेही ‘नमो भवन’ बांधले जाईल, असे विधान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केले. ‘बांगलादेशी घुसखोरांना मारले जाईल आणि संथाल परगणा येथून हाकलून दिले जाईल’, असेही ते या वेळी म्हणाले. संथाल परगणा झारखंड राज्यातील ५ विभागांपैकी एक विभाग आहे. या विभागात गोड्डा, देवघर, दुमका, जामतारा, साहिबगंज आणि पाकूर या ६ जिल्ह्यांचा समावेश आहे.
Will build ‘Namo Bhavan’ for Hindus suffering harassment from Muslims! – @nishikant_dubey BJP MP from #Jharkhand
• Will implement NRC and drive out Bangladeshi infiltrators from Santhal Pargana!
👉 Along with building a shelter for Hindus oppressed by Mu$l!ms, a situation must… pic.twitter.com/9BMWdNOTwP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 6, 2024
खासदार दुबे म्हणाले की, ही घोषणा राज्यघटनेच्या विरोधात नाही. विरोधक म्हणत आहेत की, आम्ही पक्षपाती आहोत; पण काँग्रेसने ७५ वर्षांत अनेकदा असे केले आहे. अल्पसंख्य म्हणून मुसलमानांना लाभ दिले जात असतील, तर हिंदू म्हणून हिंदूंना आम्ही लाभ देणार आहोत.
हा देश हिंदु राष्ट्र आहे आणि मुसलमानांच्या नावावर राजकारण केले जाऊ शकत नाही !
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करतांना हिंदूंना हिंसाचारी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देतांना खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत म्हटले होते की, विरोधक असत्याला सत्य म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. नेहमीच मुसलमानांचे लांगूलचालन करणारे विरोधी पक्ष आज ‘हिंदू-हिंदू’ असा जयघोष करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशाला संदेश दिला आहे की, हा देश हिंदु राष्ट्र आहे आणि मुसलमानांच्या नावावर येथे कोणतेही राजकारण केले जाऊ शकत नाही.
संपादकीय भूमिकामुसलमानांकडून पीडित हिंदूंसाठी भवन बांधण्यासह हिंदूंवर अत्याचार करण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे. त्यासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय आहे ! |