(म्हणे) ‘मोदी सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेल्या अप्रसन्नतेवरून लक्ष हटवण्यासाठी समान नागरी कायद्याचा प्रस्ताव !’ – शरद पवार

देशातील जनतेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात अप्रसन्नता आणि अस्वस्थता आहे. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी समान नागरी कायद्याचा प्रस्ताव आणण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

आदित्‍य ठाकरे यांच्‍या आरोपांना पत्रकार परिषद घेऊन सडेतोड प्रत्‍युत्तर देणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

दीपक केसरकर म्‍हणाले, ‘‘आदित्‍य ठाकरे यांच्‍यासारख्‍या तरुणांना शिकवणारे दुसरेच कुणीतरी आहे. ‘खोटे बोला; पण रेटून बोला’, असे करून आमच्‍यावर खोटे आरोप करत आहेत.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !

या आरोपांच्या प्रकरणी तातडीने अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

भारतात जात, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव केला जात नाही ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा

पाकिस्तानने त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी आक्रमणासाठी होणार नाही, याची काळजी घ्यावी !

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !

गुरुपौर्णिमेपासून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण कार्यक्रम चालू होणार ! – महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा  

राज्यातील ३ लाख ५० सहस्र शाळा आणि महाविद्यालयीन युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे !

इंदुरीकर महाराजांवरील खटला चालू ठेवण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात कॅव्‍हेट’ प्रविष्‍ट करण्‍याची अंनिसची घोषणा !

कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उपाख्‍य इंदुरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्‍यासंबंधी वक्‍तव्‍य केल्‍याप्रकरणी महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकर महाराजांवरील खटला चालू ठेवण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयात ‘कॅव्‍हेट’ प्रविष्‍ट करणार असल्‍याची घोषणा केली आहे.

कळंगुट पंचायतीला पोर्तुगालच्या फुटबॉलपटूचा पुतळा चालतो, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का चालत नाही ?

‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या या प्रक्रियेसाठी अनेक अडथळे आणण्यात आले. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झाला त्याला कळंगुट पंचायतीचे आडमुठे धोरण उत्तरदायी आहे.’’

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाविषयी पणजी (गोवा) येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेतील प्रश्‍नोत्तरे

पणजी येथे १४ जून या दिवशी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी गोव्‍यातील हिंदूंना भेडसावणार्‍या विषयाचे जिज्ञासूपणे प्रश्‍न विचारून त्‍यावर हिंदु जनजागृती समितीची भूमिका जाणून घेतली.

कुंकळ्ळी येथील वर्ष १५८३ च्या पोर्तुगिजांच्या विरोधातील उठावावर लघुपट काढा ! – कुंकळ्ळी चिफ्टन मेमोरियल ट्रस्ट

वर्ष १५८३ च्या पोर्तुगिजांच्या विरोधातील उठावावर लघुपट काढल्यास जगभरातील इतिहासतज्ञांना याचा लाभ होईल आणि त्यांना यावर अधिक संशोधन करण्यास साहाय्य होईल.