हे दाऊदचे अराष्ट्रवादी समर्थक !

मोठा गाजावाजा करून कारवाई चालू करायची, थोडे केल्यासारखे काहीतरी दाखवायचे आणि नंतर साटेलोटे झाले की, काढता पाय घ्यायचा, हे या तरी प्रकरणात होऊ नये. भारतीय जनतेला विसराळूपणाचा शाप आहे. आपल्याकडे मोठी प्रकरणेही एवढी घडत असतात की, पुढचे काही घडले की, जनता जुने सर्व विसरून जाते.

मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत बाँबस्फोट करणार्‍या आतंकवाद्यांकडून भूमी खरेदी करण्याचे कारण काय ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई येथे बाँबस्फोट करणार्‍यांसमवेत भूमी खरेदीचा व्यवहार का केला ? एखाद्या मंत्र्यांनी आतंकवाद्याकडून भूमी खरेदी करण्याचे कारण काय ?

छत्रपती शिवरायांप्रमाणे कृती करा !

नुसती शिवजयंती साजरी करणे, ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणा देणे आणि पुतळे बसवणे यांवरून राजकारण करून शिवरायांचे विचार कृतीत येतील का ? महाराजांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले, तरच पुतळे उभारल्याचे सार्थक होईल. हा आदर्श शासनकर्त्यांनी समाजासमोर ठेवणे अपेक्षित आहे.

अंतिम प्रभाग रचनेत योग्य पालट न केल्यास न्यायालयात जाणार ! – गणेश नाईक, आमदार

नियमानुसार नाला, मोठे पूल, मोठे रस्ते या सीमा घेण्याऐवजी छोट्या गल्ल्या यांची सीमारेषा ठरवली आहे. इमारतींचे, घरांचे, वस्त्यांचे विनाकारण विभाजन करण्यात आले आहे.

नेहरूंच्या भारतात सध्या निम्म्या खासदारांवर गुन्हे नोंद ! – सिंगापूरच्या पंतप्रधानांची स्पष्टोक्ती

भारत सरकारकडून आक्षेप घेत सिंगापूरच्या राजदूताला समन्स
ही स्थिती स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील राज्यकर्त्यांना लज्जास्पद !

वलसाड (गुजरात) येथे ‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ याविषयावर वक्तृत्व स्पर्धा  

सरकारी आणि खासगी शाळांमधील ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसुम विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये ‘मारो आदर्श नथुराम गोडसे’ असा विषय होता. यामध्ये पंडित नथुराम गोडसे यांना आदर्श म्हणणार्‍या मुलाला पहिले पारितोषिक देण्यात आले.

कॅनडातील ‘फ्रीडम कॉन्वाय’चे लोण आता फ्रान्समध्ये !

हॉटेल, दारूची दुकाने आणि अन्य सार्वजनिक स्थळे या ठिकाणी येण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य केल्याच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे. कॅनडाच्या धर्तीवर या आंदोलनालाही ‘फ्रीडम कॉन्वाय’ असे नाव देण्यात आले आहे.

हिजाब प्रकरणामागे  ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’चा हात ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश

सरकारने या संघटनेवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

(म्हणे) ‘ जशी हिंदु महिलांची ‘मंगळसूत्र’ ही ओळख आहे, तशीच मुसलमान महिलांची ‘हिजाब’ ही ओळख आहे !’ – काँग्रेसचे खासदार टी.एन्. प्रतापन्

कशाची तुलना कशाशी करावी, हेही न समजणारे प्रतापन ! अशी तुलना करून ते महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याचे समर्थन करू शकत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !

उत्तरप्रदेशातील निवडणूक आणि हिंदुत्व !

निवडणुकीच्या निकालातून जनकौल आपल्याला दिसून येईल. उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या निकालाचे दूरगामी परिणाम होतील एवढे मात्र निश्चित !