भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता ! – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून त्यांना ‘माझ्या समवेत लढणार का ?’, असे विचारणार आहे.

संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून राजकारण !

१० फेब्रुवारीला पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिका करत आहे, तर पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या वंशजांच्या हस्ते १९ फेब्रुवारी या दिवशी केले जावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करणार ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजप आमदारांचे केलेले निलंबन घटनाबाह्य ! सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला असून आमदार म्हणून कर्तव्य बजावण्याचा अधिकार त्यांना बहाल केला आहे.

निवडणूक : खोटी आमिषे आणि लाच देण्याचा हंगाम !

मतदारांना लाच देणे यांची सूची न संपणारी ! विनामूल्य वस्तू, सुविधा आणि अनुदाने यांचे पैसे कुणाच्या खिशातून दिले जाणार आहेत ? अशा प्रकारे हे तथाकथित लोकप्रतिनिधी लाच देऊ करतात; कारण ‘लोकच लाच मागतात’ कि ‘नेत्यांचीच लाचखोर वृत्ती आहे ?’ ‘यथा प्रजा तथा राजा’ कि ‘यथा राजा तथा प्रजा’ ?

निवडणुकीच्या काळात मतदारांना विनामूल्य गोष्टी देण्याच्या आश्‍वासनांच्या विरोधात जनहित याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? निवडणूक आयोग स्वतःहून याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?

उत्पल मनोहर पर्रीकर यांची भाजपला सोडचिठ्ठी : पणजी मतदारसंघातून अपक्ष या नात्याने निवडणूक लढवणार

माझ्या राजकीय कारकीर्दीची कुणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण जनता माझ्यासमवेत आहे. भाजपने माझ्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध केले होते; मात्र मी राजकारणात एखादे पद किंवा सत्तेसाठी उतरलेलो नाही.

साहित्यांतून प्रेरणा घेऊन काम करणारे राजकारणी आणि समाजकारणी असतात ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

राजकारण, समाजकारण आणि तरुण पिढी यांना साहित्यिकांनी प्रभावित केले आहे. पिढी घडवण्यात साहित्य, संस्कृती, इतिहास आणि वारसा महत्त्वाचा असतो.

मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या नेत्यांची चढाओढ !

अखिलेश सरकारने मुसलमानांचे तुष्टीकरण करण्यासाठी ‘माननीय श्री कांशीरामजी ऊर्दू-अरबी फारसी विश्वविद्यालय’ हे नाव पालटून ‘ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्दू-अरबी आणि फारसी विश्वविद्यालय’, असे नवीन नाव दिले.

आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेच्या सहाय्यासाठी भारत सरसावला

भारताचे विदेशमंत्री जयशंकर आणि श्रीलंकेचे वित्तमंत्री बासिल राजपक्षे यांच्यात झालेल्या एका बैठकीत भारताने अनेक करारांवर स्वाक्षरी करत सहाय्याचे आश्वासन दिले.

गोवा विधानसभेच्या एक चतुर्थांश आमदारांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन आणि ३ चतुर्थांश आमदारांनी पक्षांतर करून केला राष्ट्रीय विक्रम !

जे निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी; म्हणून आपला पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात जातात, ते राष्ट्रद्रोही असतात; कारण ते जनतेची फसवणूक करतात !