राज्यातील मंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न; अधिवेशन संपण्यापूर्वी ‘पेनड्राईव्ह’ देणार ! – शशिकांत शिंदे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

जनतेने निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनेच लोकशाहीची वस्तुस्थिती मांडून लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. अशी लोकशाही जनतेचे हित कसे साधणार ?

मार्च २०२२ मध्ये नैसर्गिक आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता !

ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीवरून मार्च २०२२ या मासात देशात नैसर्गिक आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता ‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या घरावर आयकर विभागाकडून धाडी !

‘‘भाजपला महाविकास आघाडीची भीती वाटू लागली. तेव्हापासून या धाडी चालू आहेत. उत्तर प्रदेश, भाग्यनगर, बंगाल येथेही असेच करण्यात आले. आता महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत; म्हणून येथे त्यांच्या कारवाया चालू आहेत.’’

पोलीसदलावरील राजकीय दबाव महाराष्ट्राला अधोगतीला नेणारा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर आक्रमण होऊन ४ दिवस उलटले, तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही, ही शोकाची आणि गंभीर गोष्ट आहे.

समाजहित साधणारे राजकारणी हवेत !

सध्याचे राजकारणी जे राजकारण करतात, त्यात समाजहित अल्प आणि स्वहित अधिक असते. राजकारण करण्यामागील समाजहिताची भावना बहुतांश राजकारणी विसरले आहेत. लोकशाही खर्‍या अर्थाने सुदृढ करायची असेल, तर समाजहितासाठी राजकारण करणारे शासनकर्ते असणे आवश्यक आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सत्ताधारी आणि विरोधक यांनी घातलेल्या गोंधळामुळे अभिभाषण पूर्ण न करताच राज्यपालांनी केला सभात्याग !

गोंधळाचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ! लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सभागृहातील असे वर्तन हे लोकशाहीचे दुर्दैव होय !

‘सॅफ्रॉन थिंक टँक’ या मुंबईस्थित हिंदु संघटनेच्या समान नागरी कायद्याची मागणी करणार्‍या ‘ऑनलाईन’ स्वाक्षरी मोहिमेला दीड लाख लोकांचा प्रतिसाद !

लग्न आणि घटस्फोट याविषयी विविध कायद्यांमधल्या वेगवेगळ्या तरतुदींमुळे वाद निर्माण होत असून ते संपुष्टात आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समान नागरी कायदा लागू करणे आवश्यक आहे.

अणूयुद्धाचा धोका !

अणूबाँबच्या किरणोत्सर्गाचा परिणाम जपानमधील लोक आजही भोगत आहेत, तर आताच्या अणूबाँबचा परिणाम पुढील किती शतके मानवजातीला भोगावा लागेल, याची कल्पना करता येत नाही.