डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा !

शाळेतील मुलांची डोळ्यांची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.

‘ई संजिवनी टेलिकन्सलटेशन’ योजनाद्वारे अतीदुर्गम भागातील रुग्णांना सेवा दिली जात आहे ! – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

अतीदुर्गम भागांमध्ये रुग्णांना ‘टेलिमेडिसन’च्या माध्यमातून सेवा दिली जात होती. त्यानंतर केंद्र सरकारने आयुष्यमान योजनेअंतर्गत ‘ई संजिवनी टेलिकन्सलटेशन’ योजना आणली. त्यानुसार अतीदुर्गम किंवा दूरच्या भागांमध्ये रुग्णांना सेवा दिली जात आहे.

सर्पदंशावरील संपूर्ण उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करावेत !

रुग्णाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवल्याचे सिद्ध झाले, तरच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून साहाय्य मिळते, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्षांनी असे निर्देश दिले.

मुंबईत गॅस्‍ट्रो आणि लेप्‍टो यांच्‍या रुग्‍णांत वाढ

जुलै मध्‍ये धुंवाधार आणि सतत पाऊस पडत असल्‍यामुळे मुंबईतील रुग्‍णसंख्‍येत वाढ झाली आहे. १ सहस्र २७४ गॅस्‍ट्रोचे, हिवतापाचे ४१५, तर लेप्‍टोचे २४९ रुग्‍ण आहेत.

मुंबईतील ६६३ रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’च नाही !

उदय सामंत म्हणाले, ‘‘राज्यातील सर्वच रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ ९० दिवसांत करण्यात येईल.’’ मागील काही वर्षांत राज्यात वसई, भंडारा, अमरावती आदी जिल्ह्यांत रुग्णालयांत आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुण्‍यात आढळले डेंग्‍यूचे ६६ संशयित रुग्‍ण; १२ जणांना डेंग्‍यूचे निदान !

महापालिका हद्दीत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्‍यूचे ४७२ संशयित रुग्‍ण आढळले होते. याच कालावधीत डेंग्‍यूचे निदान झालेले २१ रुग्‍ण आढळले होते आणि ते सर्व जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले होते.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे डॉ. जावेद खान याने जिभेच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या हिंदु मुलाची बळजोरीने केली सुंता !

स्वतःच्या व्यवसायाचा वापर हिंदूंच्या धर्मांतरासाठी करणारे धर्मांध डॉक्टर. अशा डॉक्टरांचा परवाना रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक !

ठाणे येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले !

साधकांना बिंदूदाबन शिकवून त्यांना आपत्काळासाठी सिद्ध करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठाणे येथे नुकतेच ३ दिवसांचे बिंदूदाबन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय जिल्हा रुग्णालयातील समस्यांवर त्वरित उपाययोजना काढा ! – आमदार डॉ. राजन साळवी

जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, तसेच अस्थिरोगतज्ञ उपलब्ध नाहीत. त्यामुळे या समस्येवर तात्काळ उपाययोजना काढावी, अशी मागणी आमदार डॉ. राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांच्याकडे केली.

बलिया (उत्तरप्रदेश) येथे ३ दिवसांत ६० जण मृत्यूमुखी !

प्रतिदिन १२५ ते १३५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती केले जात आहे. १५ जून या एकाच दिवशी १५४ रुग्णांना भरती केल्यानंतर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ जूनला २०, तर १७ जूनला ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.