नेल्लूर (आंध्रप्रदेश) येथे अंधश्रद्धेमुळे ८ वर्षांच्या मुलीने जीव गमावला !
नेल्लूर (आंध्रप्रदेश) : जिल्ह्यातील बालाजी रावपेट, काळुवई मंडळ येथील एका वसाहतीत रहाणार्या भाग्यश्री नावाच्या एका ८ वर्षीय मुलीला ब्रेन ट्यूमर झाला होता. पीडितेच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेण्याऐवजी चर्चमध्ये नेले. एकूण ४० दिवस पीडितेच्या उपचारासाठी तिचे कुटुंबीय चर्चमध्ये होते. त्या वेळी कुटुंबियांनी तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली; मात्र याचा तिळमात्रही उपयोग झाला नाही. अंततः ९ डिसेंबर या दिवशी पीडित मुलीचा चर्चमध्येच मृत्यू झाला.
भाग्यश्रीला सतत डोकेदुखी आणि उलटी असा त्रास होत होता. त्यामुळे उपचारासाठी आई लक्ष्मी आणि वडील लक्ष्मय्या यांनी तिला उपाचारासाठी अनेक रुग्णालयात नेले होते; मात्र आई-वडिलांना मुलीची शस्त्रक्रिया परवडत नसल्याने त्यांनी नातेवाइकांकडे साहाय्य मागितले. त्यांच्या सांगण्यावरून उपचारासाठी मुलीला अदुरूपल्ली येथील चर्चमध्ये नेले. ‘देवाला प्रार्थना केल्याने मुलीची प्रकृती बरी होईल’, असे त्यांना सांगण्यात आले. चर्चममध्ये ४० दिवस मुलीला ठेवण्यात आले. त्यानंतर तिचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारची घटना मंदिराच्या संदर्भात घडली असती, तर एकजात पुरो(अधो)गामी आणि अंनिससारख्या संघटना यांनी आकांडतांडव केला असता आणि हिंदूंना झोडपले असते ! ही घटना चर्चच्या संदर्भात असल्याने सारे काही शांत आहे ! |