महाराष्ट्रात ‘झिका’ची एकूण रुग्णसंख्या १४० वर !
राज्यात ‘झिका’ची रुग्णसंख्या १४० वर पोचली असून त्यात सर्वाधिक १०९ रुग्ण पुणे येथे आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६३ गर्भवती आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याचसह ताप रुग्णांच्या सर्वेक्षणावर भर दिला जात आहे.