खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स
४ वर्षांपूर्वी ‘पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँके’मध्ये ३५० कोटी रुपयांचा अपहार झाला होता. यामध्ये काही रक्कम सौ. वर्षा राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्या खात्यात जमा झाल्याविषयी चौकशी करण्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आला आहे.