हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राज्यभर निवेदन
मुंबई – गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना वेचून, पाळत ठेवून ठार मारणे अशा घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतेच देहली आणि केरळ येथे हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत. तरी देहली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल अन्वेषण करण्यात यावे, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राज्यभर निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,
देहली येथे श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी निधीसंकलन करणार्या रिंकू शर्मा या हिंदु युवकाची मुसलमान युवकांकडून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. देशाच्या राजधानीत अशा घटना दिवसाढवळ्या घडत असतील, तर अन्यत्र काय स्थिती असेल, याचा विचारच करू शकत नाही. देहली येथील घटनेतील रिंकू शर्माच्या कुटुंबियांचे सांत्वन चालू असतांनाच केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राहुल कृष्णा ऊर्फ नंदू याची ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांकडून हत्या करण्यात आली आहे. केरळमध्ये अशा शेकडो हत्या गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या आहेत. अशा प्रकारे हिंदु नेत्यांच्या हत्या होण्याचे प्रमाण विशेषकरून केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि बंगाल या राज्यांत लक्षणीय आहे. हे लोण देहली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांतही पोचले असून केवळ हिंदुत्वाचे काम करणार्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे.
पुणे – दौंड तालुक्यातील केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’ यांच्या वतीने डॉ. नीलेश लोणकर यांनी संगणकीय पत्राद्वारे निवेदन दिले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि पुणे येथील ‘श्रीगौड ब्राह्मण समाजा’चे श्री. मनोहर उणेचा यांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी श्री. नागेश गायकवाड यांना, तसेच तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी श्री. सुनील कोळी यांना कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
मिरज – येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात लघुलेखक श्रीमती टी.एस्. डांगे यांनी स्वीकारले. या वेळी बजरंग दलाचे सर्वश्री आकाश जाधव, कौस्तुभ गुरव, सागर कुंभार, युवा सेनेचे श्री. अक्षय मिसाळ, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण कुलकर्णी आणि मिलिंद कुलकर्णी, सनातन संस्थेचे श्री. प्रकाश जोशी उपस्थित होते.
कोल्हापूर – येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार संतोष डांगे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री देवराज साहानी, शरद माळी, बाळासाहेब नलवडे, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. चंद्रकांत बराले, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. सुरेश आनंदे, श्री. शिवानंद स्वामी, अजिंक्य पाटील हे उपस्थित होते.
बेळगाव – येथे निवेदन अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगंटी यांनी स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय नंदगडकर, सनातन संस्थेच्या सौ. कोमल मुदनूर, सौ. शुभांगी कंग्राळकर, धर्मप्रेमी श्री. सदानंद माशेकर आणि श्री. परशराम चौगुले उपस्थित होते.
सोलापूर – येथील निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी सर्वश्री उमाकांत नादरगी, धनंजय बोकडे, शुभम रोहिटे, विशाल जाधव, सिद्धराम माने आदी धर्मप्रेमींसह हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ उपस्थित होते.
धाराशिव – येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी श्री. राजकुमार जठार, कु. पूजा जठार, भगवान श्रीनामे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे अमित कदम, संदीप बगडी, दीपक पलंगे, तसेच सनातन संस्थेचे श्री. उमेश कदम आदी उपस्थित होते.
लातूर – येथील निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री गणेश पाटील, बालाजी बनसोडे, संजय उजनीकर आदी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव – भुसावळ येथे साहाय्यक प्रांत अधिकारी राहुल नाईक यांना निवेदन देण्यात आले. या वेेळी बजरंग दलाचे विद्यार्थी जिल्हा प्रमुख प्रणव डोलारे, धर्मप्रेमी प्रवीण भोई, भूषण महाजन, उमेश जोशी उपस्थित होते. अमळनेर येथे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना विश्व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष श्री. संजय विसपुते, भाजपचे शहराध्यक्ष श्री. उमेश वाल्हे, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक श्री. आशिष दुसाणे, भाजप तालुका सरचिटणीस श्री. जिजाबराव पाटील, बजरंग दल गोरक्षा शहरप्रमुख श्री. किरण बोरसे आणि धर्माभिमानी श्री. गणेश पाटील आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. याच आशयाचेे निवेदन जळगाव आणि यावल येथेही देण्यात आले.
या संदर्भात करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या१. देहली आणि केरळ यांसह देशभरात गेल्या काही वर्षांत झालेल्या हिंदूंच्या हत्यांमागील सूत्रधार, यांत सहभागी गुन्हेगार, या हत्यांमध्ये साहाय्य करणारे धर्मांध यांच्यावर, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस अथवा राजकीय नेते यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. २. अशा प्रकरणांची चौकशी करण्यास राज्यशासन अपयशी ठरत असल्याने या आक्रमणांच्या घटनांचा सखोल तपास ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे द्यावा. देशभरातील या हत्यांच्या ‘मोडस ऑपरेंडी’चा अभ्यास करून हे षड्यंत्र उघड करावे. ३. या तपासासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा, तसेच आवश्यकतेनुसार यासाठी केंद्रीय स्तरावर एका विशेष समितीचे गठन करावे. ४. देशभरातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना तात्काळ राज्यात आणि राज्याबाहेर सुरक्षा पुरवण्याचे आदेश केंद्रशासनाने द्यावेत. |